नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यतील १२ तालुक्यांतील ८० गावे आणि ६७ वाड्या, तांडे मिळून एकूण १४७ लोकवस्त्यांना १२१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत पाणीटंचाई आहे. परंतु मुखेड, लोहा, नांदेड, कंधार या चार तालुक्यांसह देगलूर, उमरी, भोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, नायगाव या १२ तालुक्यांत पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे. या तालुक्यातील ८० गावे आणि ६७ तांडे, वाड्यांवरील ग्रामस्थांना ९ शासकीय आणि ११२ खासगी अशा एकूण १२१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवरील उपाययोजनाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत १८२४ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६८२ गावे आणि ५७ वाड्यांवरील ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

सर्व तालुक्यांत ७६६ नवीन विंधन विहिरी प्रस्तावित आहेत. त्यापैकी ५१८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ११ ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. ५०७ ठिकाणी कामे सुरू आहेत. तात्पुरत्या पूरक नळ योजनांचे ९२ पैकी ६३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. सर्व कामे सुरू आहेत. विशेष नळयोजनांच्या २०९ प्रस्तावांपैकी १९४ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. एका ठिकाणचे काम  पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com