सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाई भीषण रूप धारण करू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांतील २१६ गावे व ८९० वाड्या-वस्त्यांवर २५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईची तीव्रता वाढत असल्याने प्रतिदिन टँकरच्या संख्येत दोन ते तीनने भर पडत आहे.

जिल्ह्याच्या सर्व भागांत पाणीटंचाई वाढल्याने कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अकरा तालुक्यांतील २१६ गावे, ८९० वाड्या-वस्त्यांवरील तीन लाख ६४ हजार ५९४ लोकसंख्येस २५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक भीषण स्थिती आहे. या तालुक्यात १११ टॅंकरद्वारे ७६ गावे आणि ५७७ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ३८ हजार ५४६ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यातील ४० टँकरद्वारे ४६ गावे व १६२ वाड्या-वस्त्यांवरील ८० हजार ६८९ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यात ३६ टँकरद्वारे ३३ गावांतील ४९ हजार ५० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यातील दोन टँकरद्वारे दोन गावांतील ८२५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील ३१ टँकरद्वारे २८५ गावे व १२३ वाड्या-वस्त्यांवरील ६४ हजार ६७० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. वाई तालुक्यात सात टॅंकरद्वारे आठ गावे व चार वाड्या-वस्त्यांवरील सहा हजार ३८३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 

जावली तालुक्यात १२ टँकरव्दारे ११ गावे, नऊ वाड्यावस्त्यांवरील ११ हजार २६० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्यात तीन टँकरद्वारे तीन गावे व दोन वाड्या-वस्त्यांवरील २१२५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा तालुक्यात एक गाव व तीन वाड्या-वस्त्यांवरील ८८९ नागरिकांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. कराड तालुक्यात दोन टँकरद्वारे सहा गावांतील ५३७८ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.   

विहिरींचे अधिग्रहण वाढले संरक्षित पाण्यासाठी विहिरींच्या अधिग्रहण संख्येत वाढ केली जात आहे. सध्या जिल्ह्यात १२९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३४, खटावमधील ३७, कोरेगावमधील दोन, खंडाळ्यातील दोन, फलटणमधील १०, वाईमधील १९, पाटणमधील एक, जावलीमधील दहा, महाबळेश्वरमधील पाच, कराडमधील तीन विहिरींचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com