आटपाडी येथे २६ जूनला पाणी परिषद 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आटपाडी, जि. सांगली  ः शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी पाणी चळवळीची २६ जूनला होणारी पाणी परिषद यशस्वी करण्याचा निर्धार येथे पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आला. 

१९९२ मध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी आटपाडीत तेरा दुष्काळी तालुक्‍यांची पहिली पाणी परिषद घेतली होती. दुष्काळी तालुक्‍यांना सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी त्यांनी लढा उभारला होता. गेली २६ वर्षे हा लढा अखंडपणे सुरू आहे. या वर्षीची २७ वी पाणी परिषद आटपाडीत घेतली जाणार आहे. त्याच्या तयारीसंदर्भात येथील तांबडा मारुती मंदिराच्या सभागृहात तेरा तालुक्‍यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख होते. या वेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी, बाबूराव गुरव उपस्थित होते. 

बैठकीत पाणी परिषदेसंदर्भात चर्चा झाली. टेंभू योजनेसह अन्य सिंचन योजनांची कामे जून अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निधी असतानाही ती पूर्ण झालेली नाहीत. ती तातडीने पूर्ण करावीत. बंद पाइपलाइनची कामे पूर्ण करावीत आदी मागण्या करण्याचा निर्णय झाला.

यावेळी आमदार गणपतराव देशमुख यांनी समन्यायी पाणी वाटप पद्धतीने शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी शिवाजीराव काळुंगे, दत्ता जाधव, विश्वंभर बाबर, प्रा. आर. एस. चोपडे, बाळासाहेब बागवान, शिवाजीराव पाटील, महादेव देशमुख आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com