मासेमारी व्यावसायिकांचा जलसमाधीचा प्रयत्न

मासेमारी व्यावसायिकांचा जलसमाधीचा प्रयत्न
मासेमारी व्यावसायिकांचा जलसमाधीचा प्रयत्न

मालेगाव, जि. नाशिक : गिरणा धरणाच्या फुगवटा भागात स्थानिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना ठेकेदार मज्जाव करीत आहेत. या निषेधार्थ आणि धरणात स्थानिक आदिवासी, मच्छीमारांना मासेमारी करू द्यावी, कराराप्रमाणे ठेकेदाराने रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी मासेमारी व्यावसायिकांनी कुटुंबियांसह शुक्रवारी (ता.७) जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

मत्स्य विभाग ठेकेदारावरील कारवाईचा प्रस्ताव शासनाला सादर करेल, असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. तहसीलदार ज्योती देवरे, मत्स्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सुजाता साळुंखे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गिरणा धरणातील मासेमारीचा ठेका खासगी संस्थेकडे आहे. परिणामी स्थानिक आदिवासी, मच्छीमारांना मासेमारी करू दिली जात नाही. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळून उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. मासेमारी व्यावसायिकांनी शासनाच्या मत्स्य विभागाकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.

करारानुसार ठेकेदाराने रोजगार उपलब्ध करून दिला नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. मत्स विभागातर्फे संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार देवरे यांनी दिले. एकनाथ वाघ, संदीप शिवदे, सचिन शिवदे, संतोष सोनवणे यांच्यासह विसापूर, रोंझाणे परिसरातील आदिवासी मच्छीमारांनी आंदोलनात भाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com