जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटला

जलयुक्त शिवारातील जलसंचय आटला
जलयुक्त शिवारातील जलसंचय आटला

जळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांतील जलसंचय जवळपास संपला आहे. जूनमध्ये जोरदार पाऊस झाला. नंतर त्याने दडी मारली. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचा मोठा खंड आहे. सध्या कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या कामांच्या ठिकाणांवरील पाणीसाठा आटला आहे.

जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील जलयुक्तची कामे हाती घेण्यात आली आहेत. २०६ गावांमध्ये ही कामे होणार असून, ४ हजार २७१ कामे प्रस्तावित आहेत. यातील १२०७ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ५ कोटी ३८ लाख ७५ हजार रुपये खर्च झाला आहे.ही कामे यंदा मार्चपासून गतीने सुरू झाली. परंतु जुलै महिन्यापासून कामे रखडत सुरू आहेत. सिमेंट नालाबांध, बंधारे व पाझर तलाव दुरुस्ती, वन क्षेत्रात तळे निर्मितीची कामे आहेत. राज्य शासनाचा कृषी विभाग सर्वाधिक कामे करीत आहे. दसरा सणाच्या पूर्वी ती गतीने सुरू होतील. परंतु उन्हाळ्यात झालेल्या कामांच्या ठिकाणी जलसंचय नसल्याची स्थिती आहे.

जलयुक्तची कामे करण्यात भुसावळ, जळगाव, बोदवड, जामनेर हे तालुके आघाडीवर आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सिमेंट नाला बांध मोठ्या संख्येने या भागात झाले आहेत. जोरदार पाऊस होऊन पुन्हा जलसंचय झालाच नाही. काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने पाणी वाहून गेले. जलसंचय फारसा नसल्याने या कामांचा उपयोग आता पुढील वर्षीच पावसाळ्यात होईल, असे ग्रामस्थ, सरपंचांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com