agriculture news in marathi, Water conservation works in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना वेग
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात सुजलाम सुफलाम अकोला अभियान राबविले जात अाहे. यासाठी प्रशासनाला भारतीय जैन संघटना सहकार्य करीत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू झाली आहेत. विविध दहा विभागांतर्गत सर्वच तालुक्यांत जलदगतीने कामे सुरू आहेत. मूर्तिजापूर व पातूर तालुक्यात जलसंपदा विभागाची काही कामे पूर्णसुद्धा झाली असल्याची माहिती आहे. 

अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात सुजलाम सुफलाम अकोला अभियान राबविले जात अाहे. यासाठी प्रशासनाला भारतीय जैन संघटना सहकार्य करीत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू झाली आहेत. विविध दहा विभागांतर्गत सर्वच तालुक्यांत जलदगतीने कामे सुरू आहेत. मूर्तिजापूर व पातूर तालुक्यात जलसंपदा विभागाची काही कामे पूर्णसुद्धा झाली असल्याची माहिती आहे. 

भारतीय जैन संघटनेने विनामूल्य जेसीबी, पोकलँड मशिन उपलब्ध करून दिली आहेत. यासाठी डिझेलचा खर्च प्रशासन करीत आहे. विविध विभागामार्फत जिल्ह्यात चार हजार ९१ कामे केली जाणार आहेत. त्या माध्यमातून सुमारे १७५ लाख घनमीटर इतकी जलसंधारणाची कामे होणार आहेत. यामध्ये कपार्टमेंट बंडिंग, खोल सलग समतल चर, शेततळे, ई-क्लास शेततळे, मातीनाला/सिनाबा/गाळ काढणे, सिमेंट नाला खोलीकरण/सरळीकरण, ढाळीचे बांध, वन तलाव दुरुस्ती, मातीकाम, वनतळे, पाणी खडडे, पाझर तलाव, नद्या खोलीकरण, रुंदीकरण आदी कामे होतील. त्यासाठी २३ कोटी ५० लाख रुपयांच्या डिझेलचा खर्च होईल.

मूर्तिजापूर तालुक्यात ५७, पातूर तालुक्यात २७, बार्शिटाकळी आणि तेल्हारा तालुक्यात प्रत्येकी पाच, बाळापूर तालुक्यांत चार व अकोला तालुक्यात तीन मोठी कामे सुरू आहेत. यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. कृषी विभाग, जलसंधारण, लघुपाटबंधारे, सामाजिक वनीकरण, वनविभाग, जलसंपदा विभाग, वन्यजीव, महानगरपालिका, लघुपाटबंधारे विभागाचे त्यासाठी मदत मिळत आहे. शेतकऱ्यांना विनामूल्य गाळही दिला जाणार आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली अाहे. नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकरी (रोहयो) अशोक अमानकर, तर समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी श्यामकांत बोके हे काम करीत अाहेत.

इतर बातम्या
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...