agriculture news in marathi, Water crisis in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पाणी संकट
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

नाशिक : कमी पावसामुळे जिल्हाभर दुष्काळाचे सावट आहे. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या ८ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती आहे. जिल्ह्यात पाणीबाणी निर्माण होण्याची भीती निर्माण झाली असून, पाणीटंचाईचे संकट तीव्र होत असल्याची स्थिती आहे.

नाशिक : कमी पावसामुळे जिल्हाभर दुष्काळाचे सावट आहे. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या ८ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती आहे. जिल्ह्यात पाणीबाणी निर्माण होण्याची भीती निर्माण झाली असून, पाणीटंचाईचे संकट तीव्र होत असल्याची स्थिती आहे.

मागील महिन्यात जिल्ह्यातील धरणसाठा कमी होण्यास सुरवात झाली. ४५ टक्के पाण्याचा साठा होता. तो तब्बल १० टक्क्यांनी घटला आहे. सद्यःस्थितीत धरणांत फक्त ३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ५१ टक्के होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. नदी-नाले कोरडे पडले असून, अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. ३५० गावे आणि वाड्यांना १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

आगामी काळात जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढणार आहे. धरणांतून आवर्तन सोडावे लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात दुष्काळाची तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मार्च ते जून या कालावधीत जिल्ह्यात ‘पाणीबाणी’चे संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून उपलब्ध पाण्याचे नियोजन व त्याचा काटकसरीने वापराचे काम जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

पावसाचे माहेरघर आणि सर्वाधिक धरणांच्या तालुक्यात कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम दिसू लागला आहे. तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसू लागली आहे. सद्यःस्थितीत दारणा धरणात २९ टक्के, भावली धरणात ६, तर गंगापूर धरणात ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस उन्हाची दहाकता वाढत अाहे. 

नाशिक शहर व आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३३ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी हाच साठा ७० टक्के होता. जुलैअखेर उपलब्ध पाणी पुरवायचे आहे. त्यामुळे नाशिककरांना पाणीकपातीच्या संकटाला समोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

धरण आणि त्यातील पाण्याची टक्केवारी 

दारणा २९, भावली ६, मुकणे ११, वालदेवी २५, कडवा ०६, पालखेड २४, करंजवण ४५, वाघाड २३, ओझरखेड ४५, पुणेगाव २९, तिसगाव २४, भोजापूर ६, नांदूरमधमेश्वर ९१, चणकापूर ५०, हरणबारी ३०, केळझर २६, गिरणा २८, पुणद ५८, माणिकपूंज ६,एकूण : ३१ टक्के 

इगतपुरी तालुक्यातील धरणातील पाणीसाठा (टक्के) 

भाम ००
भावली ०६
कडवा ०६
मुकणे ११
वाकीखापरी १३
दारणा २९

गंगापूर धरणसमूहातील धरण आणि पाणीसाठा  (टक्के)

गंगापूर ३३
काश्यपी ९१
गौतमी गोदावरी ४०
आळंदी ४१
एकूण ४१ 

 

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...