agriculture news in marathi, Water crisis started to increase | Agrowon

पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

पुणे : उन्हाचा चटका वाढत असून पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. राज्यात आतापर्यंत २५७ गावे व ४ वाड्यांना २३८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी झालेला चांगला पाऊस आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळीत चांगली वाढ झाली. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होतील, असे वाटत होते. परंतु दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या तशी पाणीटंचाई तीव्र होते आहे.

पुणे : उन्हाचा चटका वाढत असून पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. राज्यात आतापर्यंत २५७ गावे व ४ वाड्यांना २३८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी झालेला चांगला पाऊस आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळीत चांगली वाढ झाली. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होतील, असे वाटत होते. परंतु दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या तशी पाणीटंचाई तीव्र होते आहे.

नागरिकांना टंचाई काळात शासनाकडून दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या नागपूर आणि ठाणे विभागात पाणीटंचाई नसली तरी उर्वरित भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत राज्यात ७० गावे ५० वाड्यांवर ६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातही पाणीटंचाईने तीव्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. सध्या मराठवाड्यातील १११ गावे ३ वाड्यावर १३८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक पाणी टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील ९६ गावांमध्ये १२० टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील आठ गावांमध्ये ११, परभणी जिल्ह्यातील एका गावामध्ये एक, नांदेड जिल्ह्यातील सहा गावांमध्ये सहा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अजूनही टँकर सुरू झालेले नाही.

विदर्भातील अमरावती विभागात गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. विभागातील अकोला जिल्ह्यातील ५३ गावांमध्ये ३९ टँकर, बुलडाणा जिल्ह्यातील सात गावांमध्ये सात टँकर, यवतमाळमधील १३ गावांमध्ये १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील एका गावात गेल्या आठवड्यापासून एका टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातील दहा गावांमध्ये नऊ टँकरने, जळगाव जिल्ह्यातील ६२ गावांमध्ये ३१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्हानिहाय सुरू झालेल्या टँकरची संख्या

जिल्हा                    टँकरची संख्या
धुळे                               ९
जळगाव                         ३१
सातारा                           १
औरंगाबाद                      १२०
जालना                          ११
परभणी                          १
नांदेड                             ६
अकोला                         ३९
बुलडाणा                        ७
यवतमाळ                     १३

 

 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...