agriculture news in marathi, water discharge from hatnur dam, jalgaon, maharashtra | Agrowon

हतनूर धरणात ९८.९० टक्के साठा
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017
जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये गणले जाणारे हतनूर धरण ९८.९० टक्के भरले असून, त्यातून सध्या विसर्ग सुरू आहे. त्यासाठी दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. तीन प्रकल्प मात्र कोरडेच राहिले आहेत. त्यात अग्नावती, बोरी व भोकरबारी या जिल्ह्यांतील पश्‍चिम पट्ट्यातील प्रकल्पांचा समावेश आहे.
 
जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये गणले जाणारे हतनूर धरण ९८.९० टक्के भरले असून, त्यातून सध्या विसर्ग सुरू आहे. त्यासाठी दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. तीन प्रकल्प मात्र कोरडेच राहिले आहेत. त्यात अग्नावती, बोरी व भोकरबारी या जिल्ह्यांतील पश्‍चिम पट्ट्यातील प्रकल्पांचा समावेश आहे.
 
जिल्ह्यात यंदा पाऊस जेमतेम असाच राहिला. सप्टेंबरच्या मध्यात आलेल्या पावसामुळे बहुळा, मन्याड प्रकल्पातील साठा काहीसा वाढला; पण तोदेखील आजघडीला जेमतेम असाच आहे. जिल्ह्यातील हतनूरमध्ये १०० टक्के जलसाठा राहील हे निश्‍चित आहे. गिरणामध्ये ६५.४०, वाघूरमध्ये ७१.७३ टक्के जलसाठा आहे. ही बाब लक्षात घेता यंदा वाघूर व गिरणा धरणातून प्रत्येकी तीन व दोन आवर्तने मिळतील, हे निश्‍चित आहे. हतनूरमधूनही तीन आवर्तने मिळतील. 
 
सध्या जिल्ह्यात कुठेही पाऊस नाही. काही भागांत मागील आठवड्यात कमी- अधिक पाऊस झाला; पण प्रकल्पांमधील साठा वाढेल, अशी कुठलीही स्थिती नाही. सध्या हतनूर वगळता इतर कुठल्याही प्रकल्पात आवक सुरू नाही. आवक जवळपास थांबली आहे. सध्याचा साठा हा अंतिम असू शकतो, असे संकेत गिरणा भवनमधून मिळाले आहेत. 
 
 जिल्ह्यातील प्रकल्पांमधून आवर्तने देण्यासंबंधी कुठलाही निर्णय झालेला नाही; पण त्यासाठी लवकरच कालवा समितीची बैठक होणार आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व संबंधित लाभार्थी शेतकरी या बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीची तारीख ठरलेली नाही; परंतु पुढील आठवड्यात ही बैठक होईल, अशी माहिती मिळाली. 
 
विविध प्रकल्पांमधील साठा (टक्के) ः हिवरा ३९.४७, तोंडापूर ७४.३३, बहुळा ५.४७, अंजनी ३.८४, गूळ ६३.६६, बोरी ००, भोकरबारी ००, मन्याड ३७.३७, अभोरा १०० मंगरूळ १००, सुकी १००, मोर ५९.०८, अग्नावती ००. 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...