कोयना धरणातून विसर्ग
कोयना धरणातून विसर्ग

कोयना, कण्हेर धरणांतून विसर्ग

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी ३२.७४  मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी दुपारी एक वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटावरुन साडेतीन फुटावर उचलण्यात आले. याव्दारे १३,०८१ व पायथा वीजगृहातून २१०० असा एकूण १५,१८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या सूत्रांनी दिली आहे.

माण, फलटण तालुक्‍याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्‍यांत कमी आधिक स्वरूपात पाऊस झाला. महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा आणि कराड तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक आहे. पावसामुळे अनेक शेतात पाणी साचून राहिले असून, पिके कुजण्याच्या भीतीने पाणी काढून देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा या तालुक्‍यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. या धरण क्षेत्रातील कोयना येथे १३५, नवजा येथे १८३, महाबळेश्वर १३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ७९.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. बुधवारी कण्हेर धरणातून ५०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

तालुकानिहाय पाऊस मिमी ः सातारा ४३.१३ , जावली ४५.३८ ,पाटण ५२.९१, कराड ३२.४६, कोरेगाव ९.८९ , खटाव १०.४२, माण १, फलटण ०, खंडाळा २.९०, वाई ८.५७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com