उजनी धरणातून भीमेमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू
सुदर्शन सुतार
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २१) पहाटे चारच्या सुमारास पुन्हा सुरवात केली; पण त्यात जोर नव्हता. दरम्यान, पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरवात केल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आहे, पण धरणातील पाणीपातळी सध्या स्थिर आहे. 

सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २१) पहाटे चारच्या सुमारास पुन्हा सुरवात केली; पण त्यात जोर नव्हता. दरम्यान, पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरवात केल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आहे, पण धरणातील पाणीपातळी सध्या स्थिर आहे. 

गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत अधून-मधून तो हजेरीही लावतो आहे. पण हवा तसा जोर नाही. गुरुवारी दिवसभर कधी ढगाळ वातावरण होते. तर कधी हलक्‍या धारा बरसत होत्या. त्यामुळे सूर्यदर्शन उशिरा झाले.
 
सोलापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पण तसा पाऊस काही पडत नाही. मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट भागांत पावसाचे प्रमाण होते. अन्य तालुक्‍यांत मात्र पाऊस नव्हता. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत सरासरी ११.१८ मिलिमीटर इतका पाऊस झाला.
 
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत ३७८.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. पण तो सरसकट सगळीकडे नाही. 
 
भीमेसह वीजनिर्मिती अाणि
कालव्याला पाणी सोडले
पुणे जिल्ह्यातही उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडतो आहे. त्यामुळे उजनी धरणाकडे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये जवळपास ६५ हजार ९६९ क्‍युसेक इतके पाणी सोडले जाते आहे.
 
पण धरणातील पाणीपातळी वाढून पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी पुढे १३ हजार ७०० क्‍युसेक इतके पाणी भीमेसह वीजनिर्मिती व कालव्याला सोडले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी सध्या स्थिर आहे.
 
गुरुवारी दुपारी धरणातील एकूण पाणीपातळी ४९७.१०० मीटर होती. तर त्यापैकी एकूण साठा ३४११.५९ दक्षलक्ष घनमीटर (१२०.४७ टीएमसी), तर उपयुक्तसाठा १६०८.७८ दक्षलक्ष घनमीटर (५६.८१ टीएमसी) आणि पाण्याची टक्केवारी १०६.४ टक्के इतकी होती.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...