agriculture news in marathi, water distribution crisis of mhaisal scheme, sangli, maharashtra | Agrowon

‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी होणार आंदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018
सांगली  ः म्हैसाळ योजना थकबाकीमुळे बंद आहे. योजनेची थकबाकी भरल्याशिवाय ही योजना सुरू केली जाणार नाही यावर शासन ठाम आहे. मात्र, पाणीटंचाई लक्षात घेता ही योजना सुरू का केली जात नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन सुरू होण्यासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लाभ क्षेत्रातील नागरिकांनी गावोगावी जात मोर्चाचे नियोजन सुरू केले आहे. म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांनी एल्गार करण्याची भूमिका घेतली आहे.
 
सांगली  ः म्हैसाळ योजना थकबाकीमुळे बंद आहे. योजनेची थकबाकी भरल्याशिवाय ही योजना सुरू केली जाणार नाही यावर शासन ठाम आहे. मात्र, पाणीटंचाई लक्षात घेता ही योजना सुरू का केली जात नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन सुरू होण्यासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लाभ क्षेत्रातील नागरिकांनी गावोगावी जात मोर्चाचे नियोजन सुरू केले आहे. म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांनी एल्गार करण्याची भूमिका घेतली आहे.
 
यंदा मार्च महिनाजवळ आला तरी म्हैसाळ योजनेतून उपसा सुरू होण्याची चिन्हे नाहीत. सतरा कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा बंद आहे. गेल्यावर्षीही अशीच थकबाकी होती; मात्र ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर असल्याचे पाहून शासनाने योजना सुरू केली. यंदा कोणत्याही निवडणुका नसल्याने उपशाच्या हालचाली नाहीत.
 
यंदा पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा झाला होता; पण वापर वाढल्याने विहिरींनी तळ गाठले आहेत. मार्चमध्ये फक्त पिण्यापुरतेच पाणी शिल्लक राहण्याची चिन्हे आहेत. टंचाईच्या काळात सुरू असलेली योजनेचे बिल शासन देणार अशी घोषणा केली. त्याचे बिल साडेपाच कोटी रुपये महावितरण कंपनीला वर्गदेखील केले आहेत.
 
मात्र, वीजबिलाची थकीत ३४ कोटी तर पाणीपट्टीची थकबाकी ७१ कोटी आहे. ही योजना सुरू करण्यासाठी वीजबिलाच्या पन्नास टक्के म्हणेज १७ कोटींची आवश्‍यकता आहे. त्यापैकी केवळ साडेपाच कोटीच रुपये महावितरण कंपनीकडे जमा आहेत. अर्थात १३ कोटी रुपये अजून भरले पाहिजे. तरच ही योजना सुरू होईल.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिलाअभावी योजना बंद ठेवल्या जाणार नाहीत, अशी घोषणा केली. मात्र ही घोषणा केवळ सभेपुरतीच मर्यादीत होती अशी चर्चा गावोगावी सुरू झाली आहे. त्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आता ही योजना सुररू करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक गावागावात जावून मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. 
 
मुळात निवडणुका आल्यानंतर ही योजना सुरू केली जाते. ही योजना कायम सुरू ठेवू असे आश्‍वासनही दिले जाते. मतदान होते, निकाल लागतो. त्यानंतर लोकप्रतिनिधी ही योजना बंद करण्याचे आदेश देतात. त्यानंतर ही योजना बंद होते. ज्या वेळी खरंच शेतीला पाण्याची गरज असते. त्या वेळी कोणीही पुढाकार घेत नाही. ही योजना सुरू करण्यासाठी ना लोकप्रतिनिधी पुढे येतात, ना शासन पुढे येते. निवडणुकीच्या काळात त्यांना मत मिळाल्याशी मतलब असतो. त्यानंतर शेतकरी आणि जनतेशी काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे याबाबत केवळ अामिषच दाखविले जाते, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...