agriculture news in marathi, water distribution through tanker status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात टॅंकरची संख्या घटली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

नगर  ः जिल्ह्यात पावसाचे आगमन होऊन एक महिना झाला तरीही टंचाई परिस्थिती कायम आहे. मात्र या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातून टॅंकरची मागणी कमी होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ६७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता ही संख्या घटून ६२ वर आली आहे. जुलै महिना अखेरपर्यंत जिल्ह्यातील पाणीटंचाई संपेल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.

नगर  ः जिल्ह्यात पावसाचे आगमन होऊन एक महिना झाला तरीही टंचाई परिस्थिती कायम आहे. मात्र या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातून टॅंकरची मागणी कमी होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ६७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता ही संख्या घटून ६२ वर आली आहे. जुलै महिना अखेरपर्यंत जिल्ह्यातील पाणीटंचाई संपेल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.

जिल्ह्यामध्ये साधारण तीन वर्षांपूर्वी सातशेवर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियानातून झालेली कामे व गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे टॅंकरचा आकडा यंदा शंभरीही गाठू शकला नाही. यंदा अगदी शेवटच्या महिनाभरात काही गावांत टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. पावसाला यंदा उशीर झाल्यामुळे आता पाणी स्रोतावर परिणाम झालेला असला तरी या आठवड्याच्या सुरवातीला झालेल्या पावसाने काही प्रमाणात टंचाई वर मात केली आहे.

या आठवड्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे तीन गावे व पाच वाड्या टॅंकरमुक्‍त झाल्या. सध्या जिल्ह्यामधील ५७ गावे व १९२ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख सात हजार ५४७ नागरिकांना ६२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १४ सरकारी व ४८ खासगी टॅंकर आहेत. श्रीगोंदे, जामखेड, कर्जत, शेवगाव, नेवासे, राहुरी, श्रीरामपुरात मात्र टॅंकरने पाणी देण्याची गरज पडली नाही.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...