agriculture news in marathi, water distribution through tanker status, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात टॅंकरची संख्या घटली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

परभणी : गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा तालुक्यातील ८ टॅंकर बंद झाले असून, जिल्ह्यातील टॅंकरची संख्या ३४ पर्यंत कमी झाली आहे. गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, डिग्रस येथील उच्च पातळी बंधाऱ्यांतील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येलदरी, सिद्धेश्वर धरणातील मृत पाणीसाठ्यात घट सुरू आहे.

परभणी : गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा तालुक्यातील ८ टॅंकर बंद झाले असून, जिल्ह्यातील टॅंकरची संख्या ३४ पर्यंत कमी झाली आहे. गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, डिग्रस येथील उच्च पातळी बंधाऱ्यांतील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येलदरी, सिद्धेश्वर धरणातील मृत पाणीसाठ्यात घट सुरू आहे.

तीव्र पाणीटंचाई उद्भवलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ४२ टॅंकर सुरू होते. यामध्ये पालम तालुक्यातील १५, पूर्णा तालुक्यातील ८, गंगाखेड तालुक्यातील १०, सेलू तालुक्यातील ४, जिंतूर तालुक्यातील ५ टॅंकरचा समावेश होता. २९ गावे, १४ वाड्यांवरील एकूण ५७ हजार ९२६३ लोकसंख्या टॅंकरच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून होती. या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे-नाल्यांना पूर आले होते. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमीन मुरल्याने भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे आठ गावांना पाणीपुरवठा करणारे टॅंकर बंद झाले असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जोरदार पावसामुळे गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील बंधाऱ्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी आठ वाजता १२.९६, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ९.६८, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ३०.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या आठवड्यामध्ये येलदरी धरणातील मृतपाणीसाठ्यात वाढ झाली होती. परंतु पाऊस उघडल्यामुळे आता घट सुरू झाली आहे. निम्न दुधना तसेच करपरा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...