agriculture news in marathi, water distribution through tankers,nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

नगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असली, तरी उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील ६ तालुक्‍यांतील ३६ गावे आणि १४० वाड्या-वस्त्यांमधील ७६ हजार ७६९ लोकांना ४२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाने मंजूर केलेल्या संपूर्ण खेपा होत नसल्याची बाबही समोर आली आहे.

नगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असली, तरी उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील ६ तालुक्‍यांतील ३६ गावे आणि १४० वाड्या-वस्त्यांमधील ७६ हजार ७६९ लोकांना ४२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाने मंजूर केलेल्या संपूर्ण खेपा होत नसल्याची बाबही समोर आली आहे.

उन्हाळा सुरु झाला की जिल्ह्यातील सुमारे दहा ते बारा तालुक्‍यांत गेल्या दहा वर्षांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळाच्या कालावधीतील मागील चार वर्षांत तर पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढली होती. मात्र राज्यात चार वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. जिल्ह्यांत गेल्या दोन वर्षांत या अभियानातून चांगली कामे झाली असल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे.

दोन वर्षांपूर्वी (२०१६) जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरचा आकडा ८२६ वर गेला होता. गेल्या वर्षी काहीसा हा आकडा कमी होऊन ११४ वर आला. यंदा मात्र अगदी मे महिन्यापर्यंत पाणीटंचाई जाणवली नाही. आता मात्र उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

सध्या जिल्ह्यामधील संगमनेरमधील १४ गावे आणि ५५ वाड्या, अकोले तालुक्‍यात चार गावे आणि चार वाड्या, पारनेर तालुक्‍यात नऊ गावे आणि ६१ वाड्या, नगर तालुक्‍यात पाच गावे, कोपरगाव तालुक्‍यातील एका गावांत तर पाथर्डीतील दोन गावे आणि पाच वाड्यांत सध्या पाणीटंचाई आहे. श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहाता, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रींगोदा या तालुक्‍यात मात्र पाणीटंचाई नाही. तालुकानिहाय टॅंकरसंख्या : संगमनेर ः १४, अकोले ः ४, नगर ः ५,पारनेर ः १६, कोपरगाव ः १ पाथर्डी ः २.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...