वाशीममधील ९२ प्रकल्पांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव

वाशीम पाणीसाठा
वाशीम पाणीसाठा
वाशीम  : जिल्ह्यात २० ऑक्टोबरपर्यंत ८४.२२ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांत सरासरी २६.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील ९२ प्रकल्पांत सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात पाणीउपशावर बंदी घालण्यात आली आहे.
 
प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेल्या ९२ मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये वाशीम तालुक्यातील एकबुर्जी, अनसिंग, बोराळा, धुमका, खंडाळा, शिरपुटी, उमरा शम., वारला, उमरा कापसे, जनुना सोनवळ, शेलू खु., वारा जहांगीर, सुरकंडी, अडगाव बॅरेज, गणेशपूर बॅरेज, कोकलगाव बॅरेज, ढिल्ली बॅरेज, उकळी बॅरेज, जुमडा बॅरेज, राजगाव बॅरेज, टनका बॅरेज, जयपूर बॅरेज, सोनगव्हाण बॅरेज, मालेगाव तालुक्यातील सोनल, बोरगाव, कळंबेश्वर, डव्हा, कुऱ्हळ, मसला खु., रिधोरा, सोनखास, सुकांडा, सुदी, ऊर्ध्वमोर्णा, चाकातीर्थ, अडोळ, धारपिंप्री, मैराळडोह, रिसोड तालुक्यातील कोयाळी, नेतन्सा, धोडप, गणेशपूर, गौढाळा, जवळा, करडा, कोयाळी, मांडवा, पाचंबा, वाघी, वरुड बॅरेज, वाडीरायताळ, कुकसा, वाकद, मंगरूळपीर तालुक्यातील कोलंबी, मोहरी, मोतसावंगा, नांदखेडा, पिंप्री खुर्द, सार्सी बोध, सावरगाव, सिंगडोह, जोगलदरी, चोरद, कासोळा या प्रकल्पांचा समावेश आहे.
 
मानोरा तालुक्यातील हमदरी, असोला गव्हा, बोरव्हा, चिखली, फुलउमरी, गिरोली, कारली, पंचाळा, रतनवाडी, रोहणा, रुई, वाईगौळ, वाठोद, गोंडेगाव, कुपटा, कारंजा तालुक्यातील अडाण, हिवरा लाहे, सोहळ, बेलमंडळ, बग्गी, मोहगव्हाण, झोडगा, उद्री, येवता, धामणी, वडगाव व किनखेडा आदी प्रक्लापांचा समावेश आहे. येत्या १८ जानेवारीपर्यंत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com