कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी रविवारी ( ता. १५) रात्री आठ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे अर्ध्या फुटाने उचलण्यात आले आहेत.

सहा वक्र दरवाजांतून चार हजार ७१० व पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक असे एकूण सहा हजार ८१० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.

कोयना पाणीपातळी २१६२.११ फूट असून, एकूण पाणीसाठा १०४.४९ टीएमसी आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात कोयनानगरला ४५८६ मिलिमीटर, नवजाला ५५५८ मिलिमीटर व महाबळेश्र्वरला ४७०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अहवाल सालात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी ४९५० मिलिमीटर पाऊस पडला असल्याने, तीन महिन्यांत तीन वेळा पाणी सोडण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com