दहिगाव उपसा सिंचन योजनेतून लवकरच आवर्तन
दहिगाव उपसा सिंचन योजनेतून लवकरच आवर्तन

दहिगाव उपसा सिंचन योजनेतून लवकरच आवर्तन

करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेतीसाठी दहिगाव उपसा आवर्तन सोडण्याची तयारी करण्यात आली आहे. लवकरच दहिगाव उपसा सिंचनचे आवर्तन सोडले जाणार असल्याची माहिती शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या पर्जन्यमान अहवालानुसार करमाळा तालुक्‍याचा दुष्काळसदृश तालुक्‍यात समावेश होणार आहे, असेही ते म्हणाले. पाटील म्हणाले, ‘‘दोन महिन्यांत करमाळा तालुक्‍यात पुरेसा पाऊस पडला नसल्याने तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. सरासरी ५० टक्के इतकाही पाऊस झाला नाही. महिनाभरात पावसाने दडी दिल्याने खरिपाचे पीक वाया जाणार अशी परिस्थिती आहे, त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे एक आवर्तन तातडीने दिले जावे, अशी सूचना संबंधित विभागास दिली आहे. या योजनेस राखीव असलेल्या १.८१ टीएमसी पाण्यातून फक्त अंदाजे १२ एमसीएफटी एवढे पाणी चाचणीस दिले असल्याने हक्काचे पाणी शिल्लक आहे. यामुळे एक आवश्‍यक आवर्तन दिले जाणार आहे. मांगी मध्यम प्रकल्पाचा कुकडी प्रकल्पात समावेश करून ०.५० टीएमसी पाणी राखून ठेवावे.’’

तरटगाव, संगोबा व पोटेगाव येथील कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या बंधाऱ्यांत कुकडीतून कायमस्वरूपी पाणी देण्यात यावे, आदीसह इतर महत्त्वाच्या सिंचन संबंधित विषयांवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नियोजन बैठकीची मागणीही केल्याचे पाटील यांनी सांगितले.

 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com