agriculture news in marathi, water issue may rise in sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा संपत आला तरी, कोरडे असलेले पाझर तलाव यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सिंचन योजनांच्या आवर्तनासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या. पण, आवर्तन सुरू करण्यास नेत्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा संपत आला तरी, कोरडे असलेले पाझर तलाव यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सिंचन योजनांच्या आवर्तनासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या. पण, आवर्तन सुरू करण्यास नेत्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

गतवर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद शासन दरबारी झाली असली तरी, ७९ पाझर तलावांपैकी ५० हून अधिक पाझर तलाव कोरडेच आहेत. यामध्ये दुष्काळी पट्टयातील आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यांतील पाझर तलावांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांत गतवर्षाच्या तुलनेत कमी पावसाचीही नोंद झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात आटपाडी आणि जत तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आतापासूनच भेडसावू लागली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील यांची निवड झाल्यानंतर दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांत चैतन्य निर्माण झाले होते. खासदार पाटील यांनी जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनेच्या अावर्तनासाठी सांगली, सोलापूर जिल्ह्यांसह सांगोला तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन चारच दिवसांत सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन या योजनांची अावर्तने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते. पण, बैठक होऊनही बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी, सिंचन योजनांच्या अावर्तनाचे नियोजन अद्याप झालेले नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी या योजनांच्या आवर्तनाकडे डोळे लावून बसले आहे.

दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजनांची गेल्या १६ वर्षांच्या काळात राजकीय मंडळींनी अनेकवेळा बटने दाबून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर या सिंचन योजना कळीचा मुद्दा ठरल्या आहेत. म्हैसाळ सिंचन योजनेवर मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि सोलापूर जिल्ह्यांतील सांगोला तालुक्याचे राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळींनी आतापासूनच तयारी चालविली आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंचन योजनांच्या अावर्तनाचा आणि पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता बळावली आहे. आठवडाभरात या सिंचन योजनांची आवर्तने सुरू झाली नाही, तर दुष्काळी भागातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...
एकरकमी एफआरपी मिळण्यास विलंबसांगली ः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेला साखर...