agriculture news in Marathi, Water issues questioned by Savitri Mohit and the villagers from the state of Maharashtra | Agrowon

सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सोडविला पाणी प्रश्‍न
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी समस्येची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे या सर्वांवर विसंबून न राहता सामूहिक प्रयत्नातूनच पाणी समस्येवर सावळी मोहितकर ग्रामस्थांनी मात करण्याचा निर्धार केला. त्याकरिता एक लाख रुपयांपेक्षा अधिकची वर्गणी गोळा करण्यात आली.

नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी समस्येची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे या सर्वांवर विसंबून न राहता सामूहिक प्रयत्नातूनच पाणी समस्येवर सावळी मोहितकर ग्रामस्थांनी मात करण्याचा निर्धार केला. त्याकरिता एक लाख रुपयांपेक्षा अधिकची वर्गणी गोळा करण्यात आली.

गाव करी ते राव काय करी, असे म्हटले जाते. सावनेर तालुक्‍यातील सावळी (मोहितकर) ग्रामस्थांनी हा वाक्‍प्रचार आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणला आहे. सावळीसह खुर्सापार, जोगा, माळेगाव, रायबासा, जटामखोरा, बिळगाव या गावांमधील पाणीप्रश्‍न उन्हाळ्यात अधिक तीव्र होत होता. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात या गावांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून पाणीटंचाई आराखड्यातील उपाययोजना राबविण्यात आल्या नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी या समस्येवर मात करण्याचा निश्‍चय केला. यासाठी सर्वांत आधी सावळीच्या सरपंच व सचिवांकडे बोअरवेलची मागणी करण्यात आली. परंतू त्याच्याही मंजूरीला उशीर झाल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले.

यावर मात करण्यासाठी म्हणून सरपंच किसन ढोलेकर, सचिव सातपूते, गावकरी चंदा सरयाम, नंदा मोहितकर, देवका सरयाम, गोविंदा ठोंबरे, डोमा परतेकी, चंक्रधर मोहितकर, मार्कंड घुगल, अरविंद पंचभाई, दामोदर उ उईके सरसावले. घरोघरी जात निधी गोळा करण्यात आला. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम जमा झाली. ही रक्‍कम ग्रामपंचायतीला दिल्यावर ग्रामपंचायतने पाणीपुरवठ्याच्या विहिरीत बोअरवेल केले. यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

पाण्यासाठी सबकुछ
पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न एैरणीवर आहे. परिणामी, भूजलपातळी घटायला नको म्हणून शेतातील विहिरीचे खोलीकरण न करण्याचा निर्णय सावळी ग्रामस्थांनी घेतला. ग्रामस्थांनी एकदिलाने पाणी समस्येवर मात केल्याने आमदार सुनील केदार यांनी सरपंचांसह ग्रामस्थांचे कौतुक केले.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...