agriculture news in marathi, Water lecage in the Banpur Dam | Agrowon

बनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळती
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

``गावाजवळ वांग नदीवर बंधारे बांधले असून, नसल्यासारखेच आहेत. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतानाही पाटबंधारे विभाग इतकी वर्षे गप्पच आहे. या प्रश्‍नी शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.``
- सुरेश सपकाळ, शेतकरी, बनपुरी.

 

ढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण) येथील कोल्हापूर पद्धतीच्या दोन्ही बंधाऱ्यांतून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. महिंद धरणातून पाणी सोडूनही गळतीमुळे बंधारे रिकामे होत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पाणीपट्टी भरूनही शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महिंद धरणाचे लाभक्षेत्र धरणापासून सुमारे चार किलोमीटर परिसरात बनपुरी गावापर्यंत आहे. ८५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या धरणाचे ३०४ हेक्‍टर सिंचन क्षेत्र असून लाभक्षेत्रात वांग नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे चार बंधारे बांधून पाणी अडविण्यात येत आहे. त्यातील दोन बंधारे बनपुरीजवळ आहेत. २००० मध्ये धरणाची घळभरणी झाल्यानंतर बंधाऱ्यांचीही कामे मार्गी लागून नदी काठावरील सिंचनक्षेत्रात वाढ झाली. पण, बंधाऱ्यांच्या गळतीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात धरण पूर्ण क्षमतेने भरते. त्यानंतर जूनपर्यंत पाणी सोडण्याची रोटेशन निश्‍चित केलेली असतात. मात्र, गळतीमुळे बनपुरी जवळच्या बंधाऱ्यात पाणीच साठून राहत नसल्याने क्षणात बंधारे रिकामे होत आहेत.
पाटबंधारे विभाग सिंचनाखालील क्षेत्रानुसार शेतकऱ्यांकडून नियमित पाणीपट्टी वसुली करीत असला, तरी बंधाऱ्याच्या या अवस्थेमुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...