जायकवाडीतून गोदावरीच्या पात्रात विसर्ग

जायकवाडी धरण
जायकवाडी धरण

औरंगाबाद : अंशत: पाणी घटल्यानंतर पुन्हा तुडूंब झालेल्या जायकवाडी प्रकल्पातून बुधवारी (ता.११) सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोदावरीच्या पात्रात जवळपास १८,७४४ हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाण्याचा येवा जसजसा कमी होईल तसतसा शंभर टक्‍के पाण्याची पातळी कायम ठेवून गोदावरीच्या पात्रातही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नऊ वर्षांनंतर जायकवाडी प्रकल्प तुडूंब झाला आहे. उर्ध्व भागात होत असलेल्या पावसामुळे त्या भागातील प्रकल्पांमधून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने यंदा जायकवाडी प्रथमच तुडूंब झाला आहे. १ जूनपासून १० ऑक्‍टोबरपर्यंत उर्ध्व भागातून जायकवाडीत ७९.३३ टीएमसी पाण्याची आवक झाली.

गत २४ तासांत जायकवाडीत ०.६९ टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यामुळे जायकवाडीचा एकूण पाणीसाठा २९०९.०४१ दलघमीवर तर जिवंत पाणीसाठा २१७०.९३५ दलघमीवर पोचला होता. मंगळवारी सकाळी जायकवाडीत उर्ध्व भागातून ८००६ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. तर गोदावरीच्या पात्रात १५,६९० क्‍युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

सकाळी जवळपास सहा दरवाजे उघडून सुरू असलेला हा विसर्ग दुपारी जवळपास २३ हजार क्‍युसेकवर करण्यात आला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तो घटवून १८ हजार ७७४ क्‍युसेकवर आणण्यात आला होता. त्याचवेळी जायकवाडीत उर्ध्व भागातून जवळपास १५ हजार क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. १८ दरवाजे दीड फूट वर उचलून १८ हजार क्‍युसेकने सुरू असलेला विसर्ग उर्ध्व भागातून पाण्याचा येवा घटल्याने सायंकाळपर्यंत दहा हजार क्‍युसेकवर आणण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोदावरीच्या पात्रात मंगळवारी विसर्ग सुरू असतानाच ५०० क्‍युसेकने माजलगाव प्रकल्पाच्या दिशेनेही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितिले. दरम्यान, सोमवारी (ता.९) दुपारी नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा १७ हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी जायकवाडीचे दहा गेट सहा इंचाने उचलून ५ हजार २९० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू करण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com