agriculture news in marathi, Water left in tisangi lake: Deshmukh | Agrowon

तिसंगी तलावात सोडले जाणारे पाणी बंद : देशमुख
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पंढरपूर : तिसंगी (ता. पंढरपूर) येथील तलावात नीरा उजव्या कालव्यातून बेकायदेशीर सोडले जात असलेले पाणी तत्काळ बंद करावे, अशी मागणी कासेगाव भागातील शेतकऱ्यांनी केली. आता तलावातील पाणी बंद करून ४०० क्‍युसेक पाणी कालव्याद्वारे या भागातील शेतीसाठी सोडण्यात आले. आमदार भारत भालकेंच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना हे पाणी मिळाल्याची माहिती पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांनी दिली.

पंढरपूर : तिसंगी (ता. पंढरपूर) येथील तलावात नीरा उजव्या कालव्यातून बेकायदेशीर सोडले जात असलेले पाणी तत्काळ बंद करावे, अशी मागणी कासेगाव भागातील शेतकऱ्यांनी केली. आता तलावातील पाणी बंद करून ४०० क्‍युसेक पाणी कालव्याद्वारे या भागातील शेतीसाठी सोडण्यात आले. आमदार भारत भालकेंच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना हे पाणी मिळाल्याची माहिती पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांनी दिली.

नीरा उजव्या कालव्यातून शेती पिकांसाठी कासेगाव शाखेला पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान, हे पाणी बंद करून तिसंगी तलावात  सोडावे, या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. आंदोलक शेतकऱ्यांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी शेतीचे पाणी बंद करून ते तलावात सोडले होते. परंतु, तिसंगी तलावात पाणी सोडण्यास कासेगाव भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता.

याच वेळी आमदार भालकेंनी शेतीच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, त्यानंतर तलावात पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिसंगी तलावातील पाणी बंद करून ते कासेगाव भागातील शेतीसाठी सुरू केले आहे. शेतीसाठी पाणी आल्याने कासेगाव, खर्डी, बोहाळी, उंबरगाव, रांझणी, कोर्टी, टाकळी या भागातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.

कासेगाव व परिसरात द्राक्ष, डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. दुष्काळामुळे येथील हजारो हेक्‍टरवरील द्राक्ष आणि डाळिंब बागा सुकू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत पाणीपाळी लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु, येथील द्राक्ष आणि डाळिंब शेतीसाठी आवश्‍यक पाण्याचा विचार करून आमदार भालकेंनी कासेगाव शाखेला पाणी सोडण्याचे प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच येथील हजारो हेक्‍टर फळबागांना जीवनदान मिळाल्याचे देशमुख यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...