agriculture news in marathi, Water level dawn in western Vidarbha | Agrowon

पश्चिम विदर्भातील पाणीपातळीत घट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

अकोला : दरवर्षी घटते प्रमाण तसेच सातत्याने जमिनीतून होत असलेल्या उपशामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली अाहे. यामुळे असंख्य ठिकाणी जानेवारीपासूनच विहिरींनी तळ गाठून पाणीटंचाईचा इशारा दिला. भूजल सर्वेक्षण यंत्रणांनी जानेवारीत विहिरींचे निरीक्षण नोंदवित पाणीपातळी काढली होती. पश्‍चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात पाणीपातळी घटल्याचे चित्र समोर अाले अाहे.

अमरावती विभागात अकोला जिल्ह्याची सर्वाधिक २.९० मीटरने पाणीपातळीत घट दिसून अाली अाहे. तर तालुक्यांच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या तालुक्यात सर्वाधिक ७.१८ मीटर एवढी घट नोंदविली गेली अाहे.

अकोला : दरवर्षी घटते प्रमाण तसेच सातत्याने जमिनीतून होत असलेल्या उपशामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली अाहे. यामुळे असंख्य ठिकाणी जानेवारीपासूनच विहिरींनी तळ गाठून पाणीटंचाईचा इशारा दिला. भूजल सर्वेक्षण यंत्रणांनी जानेवारीत विहिरींचे निरीक्षण नोंदवित पाणीपातळी काढली होती. पश्‍चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात पाणीपातळी घटल्याचे चित्र समोर अाले अाहे.

अमरावती विभागात अकोला जिल्ह्याची सर्वाधिक २.९० मीटरने पाणीपातळीत घट दिसून अाली अाहे. तर तालुक्यांच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या तालुक्यात सर्वाधिक ७.१८ मीटर एवढी घट नोंदविली गेली अाहे.

गेल्या काही वर्षांत पावसाची अनियमितता कमालीची वाढली अाहे. पाऊस सलग न पडणे, एकाच दिवशी अधिक पाऊस येणे, दोन पावसात मोठा खंड पडणे असे प्रकार सातत्याने वाढत अाहेत. मोसमात पडणाऱ्या पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर पुरेशी दिसत असली तरी, मागील पाच वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा झालेला नाही. सोबतच पडणाऱ्या पावसाचे दिवस कमी होत गेले अाहेत. जे पाणी पडते ते वेगाने वाहून जात असल्याने साहजिकच जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे.

अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांत प्रत्येक तालुक्यात विहिरींची पातळी मोजून पातळीत घट किंवा वाढ झाल्याबाबत निरीक्षण नोंदविण्यात अाले होते. त्यानुसार अकोला जिल्हा सरासरी पातळी घटीमध्ये अाघाडीवर दिसून अाला अाहे. या जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात ४.६४ मीटर तर बाळापूर ३.९३, पातून ३.०४, अकोला २.६३, बार्शीटाकळी २.१७, अकोट २.१० तर मूर्तिजापूरमध्ये १.८० मीटर पातळी घट दिसून अाली.

जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने विभागातील पाचही जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यांत मिळून प्रायोगिक तत्त्वावर सुमारे साडेसहाशे विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २०१३ ते २०१८ ची सरासरी पाणीपातळीची तुलना जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाशी करण्यात अाली. त्यानंतर सरासरी अंदाज समोर अाले. भूजल पातळी घटल्याने हमखास सिंचनाचा पट्टा म्हणून अोळखल्या जाणाऱ्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद ते अचलपूर या भागात पातळीत घट होत असल्याचे विदारक चित्र पुढे अाले.

या विभागात कोणत्याही जिल्ह्यात सरासरी २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेल केले तर पाणी मिळते. मात्र हे पाणीसुद्धा अाता शाश्वत राहिलेले नाही.

जिल्हानिहाय स्थिती (मीटरमध्ये)
अकोला (-२.९०)
बुलडाणा (०.४३)
वाशीम (-१.७७)
अमरावती (-१.६४)
यवतमाळ (-१.३८)

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...