परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा जोत्याखाली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील पाणीसाठा अद्यापही जोत्याखाली आहे. टाकळवाडी (ता. गंगाखेड) तलाव कोरडा आहे. केवळ ४ तलावांमध्ये सरासरी ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आजवर पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा जमा झाल्यामुळे कोरड्या पडलेल्या तलावांची संख्या आठने कमी झाली आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी आणि सिद्धेश्वर धरणात अद्याप जिवंत पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. जायकवाडी, माजलगांव, निम्न दुधना प्रकल्प, इसापूर, विष्णुपुरी, निम्न मनार प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

रविवारी (ता.२२) सकाळी आठ वाजता जायकवाडी प्रकल्पात ५५५.६७३ दलघमी (२५.५९ टक्के), माजलगाव धरणात ६.६० दलघमी (२.२० टक्के), निम्न दुधना धरणात ३६.३६० दलमघमी (१५.०१टक्के), इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात २६९.७८ दलघमी (२७.९८ टक्के), नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पात ७४.५७ दलघमी (९२.३० टक्के), निम्न मनार प्रकल्पात १४.३४ दलघमी (१०.३८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला होता.येलदरी आणि सिद्धेश्वर धरणामध्ये अद्याप जिवंत पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. या धरणात अनुक्रमे १२२.८३० दलघमी आणि १५५.७५७ दलघमी पाणीसाठा शिल्लक होता. या दोन्ही धरणांमध्ये आजवर अनुक्रमे १०.७२ दलघमी आणि १४.३०८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. येलदरीमध्ये आवक सुरू असल्यामुळे लवकरच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होईल.

जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पांमध्ये गतआठवड्याप्रमाणेच ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. परंतु गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील ढालेगांव येथील उच्चपातळी बंधाऱ्यामध्ये १९.३६, मुद्दगल बंधाऱ्यात ११.६३, मुळी बंधाऱ्यात ९.४१, डिग्रस बंधाऱ्यात ४८.८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. टाकळवाडी येथील लघू तलाव अद्याप कोरडाच आहे. पेडगांव, आंबेगांव, नखातवाडी, तांदुळवाडी, राणीसावरगांव, कोद्री, देवगांव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, आडगांव, केहाळ, भोसी, मांडवी, दहेगांव या १७ तलावामध्ये जोत्याखाली पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com