agriculture news in marathi, water level decrease in sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील पाणीसाठ्यात १६ टक्‍क्‍यांनी घट
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018
सांगली  ः परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ५ मध्यम आणि ७९ लघू प्रकल्पांत ५८ टक्के पाणीसाठा होता. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अर्थात एका महिन्यात ८४ प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुमारे १६ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.
 
सांगली  ः परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ५ मध्यम आणि ७९ लघू प्रकल्पांत ५८ टक्के पाणीसाठा होता. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अर्थात एका महिन्यात ८४ प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुमारे १६ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.
 
कवठेमहांकाळ तालुक्‍यातील बसाप्पावाडी, तर तासगाव तालुक्‍यातील सिद्धेवाडी तलावात एकही थेंबही शिल्लक नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यांत पाणीटंचाईची शक्‍यता आहे. गतवर्षी पाणीटंचाईचे संकट असताना परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगला दिलासा मिळाला होता.
 
परतीचा पाऊस व टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या आवर्तनामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पामध्ये पाणीसाठा वाढला होता. डिसेंबर महिन्याअखेर ५८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला होता. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाई भासू लागली आहे. तलावामध्ये असलेला पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
 
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच मध्यम प्रकल्पांमध्ये २४.७५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५० टक्के, तर लघू प्रकल्पांमध्ये ६८.०६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जत तालुक्‍यात एकूण २८ तलाव आहेत. या तलावात १४४६.८० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
२८ तलावांपैकी ६ तलावात पाणीसाठा शुन्य टक्के असल्याची नोंद आहे. त्यापैकी संख तलावात ८५, तर लघू प्रकल्पातील दरीबडची या तलावात ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जत तालुक्‍यात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

पाणीसाठा स्थिती
प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी) टक्केवारी
मध्यम प्रकल्प ५ २४.७५ ५०
लघू प्रकल्प ७९ ६८.०६ ३९ 
एकूण ८४ ९२.८१ ४२

 

 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...