सीना धरणातील पाणीसाठ्यात घट

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र, धरणातील पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने कुकडीचे पाणी सीना धरणात सोडावे. - कल्याण सटाले, शेतकरी, निमगाव गांगर्डा.
सीना धरण
सीना धरण

कुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने या धरणात यंदा अजूनही नव्या पाण्याची आवक झालेली नाही. धरणात असलेला पाणीसाठाही झपाट्याने घटत आहे. दरम्यान, सीना धरणात भोसे खिंड बोगद्यातून कुकडीचे पाणी सोडले आहे. मात्र, अजूनही पाणीपातळीत वाढ झालेली नाही.

उगम क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणात यंदा नवीन पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुकडीच्या ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सीना धरण हे नगर व बीड जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान  ठरते. सीना धरणाची साठवण क्षमता  २४०० दशलक्ष घनफूट इतकी आहे. धरणातील पाण्यामुळे परिसरातील शेती सिंचनाखाली येते. त्याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना होतो. सध्या धरणाच्या पाण्यावर उसाचे मोठे क्षेत्र उभे असून, काही ठिकाणी ऊस लागवडी सुरू आहेत. इतर नगदी पिके चांगली आहेत. त्यामुळे दररोज पाण्याचा उपसा सीना धरणातून होत आहे. त्यामुळे पाणीपातळी खालावत चालली आहे. मात्र, दरवर्षीच सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना घटत्या पर्जन्यमानाचा फटका बसत आहे. सीना लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com