agriculture news in marathi, water level increase due to rain, pune, maharashtra | Agrowon

पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास सुरवात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पाणलोटातील झरे, ओढे, नाले, नद्यांना पाणी आल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये जवळपास दीड टीएमसी पाणी जमा झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून १६.९५ टीएमसी (७.८२) पाणीसाठा उपलब्ध आहे.

पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पाणलोटातील झरे, ओढे, नाले, नद्यांना पाणी आल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये जवळपास दीड टीएमसी पाणी जमा झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून १६.९५ टीएमसी (७.८२) पाणीसाठा उपलब्ध आहे.

पावसाला उशीर झाल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे अचल (मृत) पातळीत गेली होती. मात्र पावसाला सुरवात होताच सर्व धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागण्याने धरणांची पाणीपातळी चल (उपयुक्त) पातळीत आली आहेत. उजनी धरणाचा पाणीसाठा अचल पातळीमध्ये गेला आहे. मंगळवारी (ता. २६) उजनी धरणाच्या अचल साठ्यामध्ये जवळपास ५३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

पिंपळगाव जोगे, घोड, वरसगाव, टेमघर ही धरणे मृतसाठ्यात असून, नाझरे, वडज, विसापूर धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा उपलब्ध असून, गेल्या वर्षी याच तारखेला जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून १२.७० टीएमसी (५.८६) टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. धरणांमध्ये हळूहळू पाणी येऊ  लागल्याने धरणांचा पाणीसाठा वाढणार असला, तरी आणखी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुठा खोऱ्यातील पानशेत आणि खडकवासला धरणात ०.१७ , नीरा नदीच्या खाऱ्यातील धरणांमध्ये ०.२७, कुकडी नदीच्या खोऱ्यात ०.३८, मुळशी धरणात ०.३२, कलमोडी धरणात ०.१३ टीएमसी आणि इतर धरणांमध्ये मिळून १.४६ टीएमसी नवीन पाणी जमा झाले   होते.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) : पानशेत २.६४, खडकवासला ०.२९, पवना १.७६, कासारसाई ०.१२, मुळशी ०.३९, कलमोडी ०.३२, चासकमान ०.५६, भामा अासखेड २.४९, आंद्रा १.५९, वडिवळे ०.३७, गुंजवणी ०.७३, भाटघर १.६१, नीरा देवघर ०.४४, वीर १.०९, माणिकडोह ०.६०, येडगाव १.३७, वडज ०.१०, डिंभे ०.४१.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...