agriculture news in marathi, water level increase in manyad, bahula dam, jalgaon, maharashtra | Agrowon

मन्याड, बहुळा प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ
चंद्रकांत जाधव
रविवार, 24 सप्टेंबर 2017
जळगाव : जिल्ह्यातील मृतसाठा स्थितीत गेलेले मन्याड, बहुळा या प्रकल्पांमध्ये या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा जिवंत झाला आहे. यातच अर्ध्याअधिक जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीलाही प्रथमच बऱ्यापैकी प्रवाही पाणी आल्याने दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. 
 
जळगाव : जिल्ह्यातील मृतसाठा स्थितीत गेलेले मन्याड, बहुळा या प्रकल्पांमध्ये या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा जिवंत झाला आहे. यातच अर्ध्याअधिक जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीलाही प्रथमच बऱ्यापैकी प्रवाही पाणी आल्याने दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. 
 
जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात पाऊस जेमतेम असाच होता. त्यामुळे मन्याड, बहुळा, भोकरबारी या प्रकल्पांमधील साठा वाढत नव्हता. यातच पावसाने जून, जुलै व ऑगस्टमध्ये ओढ दिल्याने या प्रकल्पांमध्ये मृतसाठाच शिल्लक राहिला. प्रकल्प कोरडे असतानाच उडीद, मूग ही पिके वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
 
परंतु, या महिन्याच्या मध्यात आलेल्या पावसाने जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाला दिलासा दिला असून, मन्याडसह बहुळा प्रकल्पातही जलसाठा वाढला आहे. आणखी पाऊस आला तर या प्रकल्पांमधील साठा वेगाने वाढण्याच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. 
दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शुक्रवारी (ता.२२) दिवसभर काही भागांचा अपवाद वगळला तर पाऊस नव्हता. सायंकाळी ऊन पडले. शनिवारी सकाळपासून उघडीपसारखे वातावरण होते. मध्येच ऊन व सावल्या अशी स्थिती होती.
 
गुरुवारी (ता.२१) वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मितावली, पारगाव (ता.चोपडा) व यावल तालुक्‍यातील काही गावांमध्ये केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच पूर्वहंगामी कपाशीच्या कैऱ्यांची नासाडी होऊन मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

सातपुड्यालगतचे मंगरूळ व अभोरा (ता. रावेर, जि. जळगाव) हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सुकी प्रकल्पदेखील ९८ टक्‍के भरला असून, मोर प्रकल्पात ५१.६९, तोंडापूरमध्ये ७३.०६ टक्के जलसाठा आहे. मृतसाठा स्थितीत असलेल्या मन्याड प्रकल्पात आता २६.४७, बहुळामध्ये ५.०५ टक्के जलसाठा झाला आहे. पण बोरी, भोकरबारी व अग्नावती या तीन्ही प्रकल्पांमध्ये मात्र शून्य टक्केच जलसाठा आहे.

शनिवारी (ता.२३) दुपारी १२.४५ वाजता  हतनूर धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडे होते, त्यात ८८.७१ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा प्रकल्पात ६५.९० तर वाघूरमध्ये ७०.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...