agriculture news in Marathi, Water level in key reservoirs at 70 percent, Maharashtra | Agrowon

देशातील जलसाठा ७० टक्क्यांवर
वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांतील पाणीसाठा ११०.०१ अब्ज क्युबिक मीटर आहे. या जलशयांच्या एकूण क्षमतेच्या ७० टक्के पाणीसाठा असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. 

नवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांतील पाणीसाठा ११०.०१ अब्ज क्युबिक मीटर आहे. या जलशयांच्या एकूण क्षमतेच्या ७० टक्के पाणीसाठा असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. 

सध्या जलाशयांमध्ये असलेला पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २.४ टक्के जास्त आहे मात्र मागील वर्षी याच काळातील पाणीसाठ्यापेक्षा ७ टक्क्यांनी कमी आहे. उत्तर प्रदेशातील धरणांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा १६ टक्के जास्त पाणीसाठा आहे; तर पश्चिम बंगालमधील धरणांध्ये ५४ टक्के अधीक पाणीसाठा आहे आणि पंजाबमधील धरणांमध्ये ६ टक्के जास्त साठा आहे, अशी माहिती जल आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून समोर आली.

तमिळनाडूमधील धरणांमध्ये सामान्य सरासरीच्या कमी पाणीसाठा आहे. या राज्यातील धरणांमध्ये सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पाणीसाठा आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये ९ टक्के कमी पाणीसाठा आहे; तर केरळमध्ये सामान्य सरासरीपेक्षा ३ टक्के कमी पाणीसाठा आहे.

यंदा मॉन्सूनमध्ये ९८ टक्के सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात सरासरी ९५ टक्केच पाऊस देशात झाला. देशात ९६ टक्के ते १०४ टक्के पाऊस पडल्यास सरीसरी एवढा पाऊस झाल्याचे हवामान विभाग जाहिर करते.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...