agriculture news in marathi, water level staus in pond, parbhani, maharshtra | Agrowon

दहा लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखालीच
माणिक रासवे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017
परभणी : अद्यापर्यंत पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील ७ आणि हिंगोलीतील ३ अशा एकूण १० लघू तलावांमधील पाणीसाठा अद्याप जोत्याखालीच आहे. नांदेड जिल्ह्यातील १९ लघू तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आत्ताच दिसत नाही. अनेक गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
परभणी : अद्यापर्यंत पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील ७ आणि हिंगोलीतील ३ अशा एकूण १० लघू तलावांमधील पाणीसाठा अद्याप जोत्याखालीच आहे. नांदेड जिल्ह्यातील १९ लघू तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आत्ताच दिसत नाही. अनेक गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
दरम्यान, रविवारी (ता. २४) येलदरी धरणांमध्ये ९३.७०२ दलघमी (११.५७ टक्के), सिद्धेश्वर धरणामध्ये ४४.३६२ दलघमी (५४.७९ टक्के), निम्न दुधना धरणांमध्ये १८२.०९० दलघमी (७५.४२ टक्के), करपरा मध्यम प्रकल्पामध्ये १५.७३३ दलघमी (६३ टक्के), मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ३.९०२ दलघमी (१४टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, दिग्रस येथील उच्च पातळी बंधारे भरले आहे.
 
परभणी जिल्ह्यातील २२ लघू तलांवापैकी झरी (ता. पाथरी) येथील लघू तलाव १०० टक्के भरला आहे. अन्य तलावांपैकी १० तलावांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत, तर ४ तलावांमध्ये २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावातील पाणीसाठ्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे.टाकळवाडी, कोद्री (ता. गंगाखेड), नखातवाडी (ता. सोनपेठ), तांदुळवाडी (ता. पालम), चिंचोली, आडगाव, दहेगाव (ता. जिंतूर) या ७ तलावांतील पाणीसाठा मात्र अद्याप जोत्याखालीच आहे.
 
हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू तलावांपैकी २ तलाव १०० टक्के भरले आहेत. ९ तलावांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. ५ तलावांमध्ये २६ ते ५० टक्क्यांपर्यंत, ३ तलावांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत, ५ तलावांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. परंतु बाभुळगाव, मरसुळ, कळमनुरी या तीन तलावांतील पाणीसाठा अद्याप जोत्याखालीच आहे.
 
नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू तलावांपैकी १९ तलावांमध्ये अद्याप उपयुक्त पाणीसाठा जमा झालेला नाही. यामध्ये देऊळगाव, दिग्रस, आखरगा, हानेगाव-२, खामगाव, वसूर, देगलूर, येडूत, लोहमांडवा, सुना, चिकाळा, मोहिजा परंडा, कोंडदेव, नंदगाव, अंबाडी, उंदरी-मांजरी, दापका, बोमनाळी या तलावांचा समावेश आहे. उर्वरित पावसाळ्यात मोठा पाऊस होऊन हे तलाव भरले तर सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल; अन्यथा या भागातील नागरिकांना लवकरच पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...
कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी...नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार...
रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे...नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाख टन खते उपलब्ध...पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली...
अकोला जिल्ह्यात १०३२ शेततळ्यांची कामे... अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत...
मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या... औरंगाबाद  : गत आठवड्याच्या तुलनेत...
परभणीत‘शेतमाल तारण योजने अंतर्गत ४०... परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या...
परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे... परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगरमधील २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना... नगर ः राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर...
नाशिक विभागातील ११०० गावांची "जलयुक्त... नाशिक : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी...
सार कसं सामसूम तरंग नाही तलावात...शेती कोरडवाहू. तरीही स्वबळावर दुग्ध व्यवसायातून...
बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ‘पॉक्‍सो’ कायद्यात...
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...