agriculture news in marathi, water lifting restricted in state | Agrowon

पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, यापुढे जलाशय अथवा कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, यापुढे जलाशय अथवा कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने ऑक्टोबर महिन्यापासून राज्याच्या विविध भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. राज्य सरकारने ऑक्टोबरअखेर १५० तालुक्यात तसेच २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. येत्या काही महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने अनधिकृत पाणी उपशाला चाप लावण्याचे ठरवले आहे. विनापरवानगी पाणी उपसा करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून पाणी चोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबर त्यांच्यावर दंडात्मक करवाई करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

पाण्याचा उपसा रोखण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बेकायदा पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.  या पथकात जलसंपदा विभागाचा शाखा अभियंता, महावितरण कंपनीचा शाखा अभियंता, महसूल विभागाचा मंडल अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांचा समावेश असेल. या पथकामार्फत दंडवसुली, वीजजोडणी खंडित करण्याचे काम केले जाईल. या कारवाईचा मासिक अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...