agriculture news in marathi, water problem will solve in 574 villages in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील ५७४ गावांचा पाणीप्रश्‍न सुटणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ८२ योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ५७४ गावांमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ८२ योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ५७४ गावांमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांना केंद्र सरकारने मार्च २०१५ मध्ये ब्रेक लावला. या योजना संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा फटका राज्यातील गावांना बसला. परिणामी, गेल्या दोन वर्षांत योजनांच्या मंजुरीची संख्या अगदी नगण्य अशी होती. त्यामुळे अनेक गावांना डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाईला तोेंड द्यावे लागत होते.
राज्य सरकारने राज्यातील योजनांबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र सरकारनेे २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना हाती घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविलेल्या सर्व योजनांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील ५७४ वाड्या-वस्त्या व गावांसाठी २९८ योजनांचा हा आराखडा आहे. या योजना राबविण्यासाठी एकूण ५०१ कोटी ८६ लाख रुपये एवढा अंदाजे खर्च लागणार आहे. तसेच आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी १० कोटी सहा लाख रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. नवीन व सुरू अशा ५८७ गावे-वाड्यांमधील ३१० योजनांसाठी एकूण ५११ कोटी ९२ लाखांच्या आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

इतर बातम्या
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
खानदेशात पपईचे पीक जोमात धुळे : यंदा पपईचे पीक कमी पाऊस असतानाही सातपुडा...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावरऔरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
'दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...सोलापूर : ‘‘दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
‘दुष्काळाच्या निकषांसाठी शासनाने...पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...