agriculture news in marathi, water release for Jayakwadi Dam in Aurangabad | Agrowon

नगर-नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले...
राजेभाऊ मोगल
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडी धरणासाठी 8.99 टीएमसी पाणी सोडन्याचे आदेश दिले होते. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले आणि पाणी सोडणे लांबले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याचा मार्ग सुकर करताच गुरुवारी (ता. एक) सकाळी दहा वाजेच्या सुमारास नगर व नंतर नाशिक येथील धरणातुन पाणी सोडले आहे. उशिरा का होईना मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. 

औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडी धरणासाठी 8.99 टीएमसी पाणी सोडन्याचे आदेश दिले होते. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले आणि पाणी सोडणे लांबले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याचा मार्ग सुकर करताच गुरुवारी (ता. एक) सकाळी दहा वाजेच्या सुमारास नगर व नंतर नाशिक येथील धरणातुन पाणी सोडले आहे. उशिरा का होईना मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. 

मराठवाड्याच्या हक्‍काचे पाणी नियमानुसार 15 ऑक्‍टोबरला सुटायला हवे होते; मात्र ऊर्ध्व भागातील धरणक्षेत्रातील राज्यकर्त्यांनी त्यास विरोध दर्शविला. त्यामुळेच 16 ऑक्‍टोबरला गोदावरी पाटबंधारे विभागात जलसंपदा विभागाची नगर, नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये जायकवाडीत 65 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणी असल्याच्या सूत्रानुसार 172 दलघमीची तूट भरून काढण्यासाठी ऊर्ध्व भागातील प्रकल्पांतून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ठरले होते.

गंगापूर (नाशिक) धरणातून पाणी सोडले.. video

यानंतर नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील राज्यकर्त्यांनी पुन्हा विरोध दर्शवीत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दरम्यान, 22 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी गोदावरी पाटबंधारे विभागाला जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार 23 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोदावरी पाटबंधारेचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी 8.99 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे नाशिक येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना आदेश दिले होते. मात्र, काही मंडळी न्यायालयात गेल्याने पाणी सोडण्यास विलंब झाला.

आता न्यायालयाने बुधवारी (ता.३१) संबंधित याचिकाच फेटाळून लावल्याने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर जलसंपदा विभागाने रात्रीतुन तयारी करीत नगर जिल्ह्यातील मुळा व प्रवरा धरण समूहातुन तर नाशिक जिल्ह्यातील गंगापुर धरणांमधून गुरुवारी पाणी सोडन्यात आले आहे.

असे सुटतेय पाणी (आकडे टीएमसीमध्ये) 

  • मुळा (मांडओहोळ, मुळा) ः 1.90 
  • प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) ः 3.85 
  • गंगापूर (गंगापूर, काश्‍यपी, गौतमी गोदावरी) ः 0.60 
  • गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) ः 2.04 
  • पालखेड (करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड, पालखेड, तीसगाव) ः 0.60 

असे आहे धरणांचे अंतर

  • गोदावरी दारणा धरणसमूह : नांदूर मधमेश्‍वर- प्रवरासंगम (अंतर 144) 
  • मुळा धरणसमूह : प्रवरा संगम (अंतर 52) 
  • गंगापूर धरणसमूह : नांदूर मधमेश्‍वर- प्रवरासंगम (अंतर 154) 
  • पालखेड धरणसमूह : नांदूर मधमेश्‍वर- प्रवरासंगम (अंतर 130) 
  • प्रवरा धरणसमूह- भंडारदरा, निळवंडे, ओझर- प्रवरासंगम (अंतर 175)

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...
सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...
शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...
निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासानपुणे : देशात साखरेचा अफाट साठा तयार होत असताना...
शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष २०१८ मध्येही...मुंबई : गेल्या चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या...
हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा...नवी दिल्ली : हवामानबदलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे...
हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले;...नवी दिल्ली : हिमवृष्टीमुळे काश्‍मिरसह हिमाचल...
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...