agriculture news in Marathi, water release for jayakwadi from Nashik today, Maharashtra | Agrowon

नाशिकमधून जायकवाडीसाठी आज विसर्ग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नाशिक :  नाशिकच्या धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अखेर मुहूर्त ठरला आहे. आज (ता. ३०) पासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. सोमवारी (ता. २९) दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक :  नाशिकच्या धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अखेर मुहूर्त ठरला आहे. आज (ता. ३०) पासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. सोमवारी (ता. २९) दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आज (ता. ३०) सकाळी दहा वाजता नाशिकच्या धरणातून सोडण्यात येणार असल्याचे या वेळी शिक्कामोर्तब झाले. यामुळे नाशिकच्या गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणांतून ३.२४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडले जाईल. नाशिक जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते. पाणी सोडण्याच्या वेळेस ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सलग तीन दिवस दारणा धरणातून १५ हजार क्युसेक तर गंगापूर धरणातून ३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा गोदावरीत विसर्ग होणार आहे. गंगापूरसह पालखेड आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. गोदावरी मराठा विकास महामंडळाने जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधून तब्बल ८.९९ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. 

यापैकी ३.२४ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तिन्ही धरणसमूहांमधून सोडावे लागणार आहे. मात्र, जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जात असून, अन्य तालुक्यांमध्येही पुरेशा पाण्यासाठी रहिवाशांना आतापासूनच वणवण करावी लागते आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे.

पाणी सोडले जाऊ नये, यासाठी अल्प कालावधीत उभारण्यात आलेला न्यायालयीन लढाही अपयशाच्या वाटेवर असून, सोमवारपासून पाणी सोडण्याचे नियोजन आहे, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. पाणी सोडण्यात आणि ते जायकवाडीमध्ये पोचविण्यात ज्या यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, अशा यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती.

बैठकीस शहर आणि ग्रामीण पोलिसांसह, पाटबंधारे, महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी करावयाच्या तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. गंगापूरसह दारणा आणि पालखेड या दोन्ही धरणसमूहांमधून मंगळवारी सकाळपासून पाणी सोडण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले.

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...