‘वान’सह ‘सोनल’ प्रकल्पातून पाणी सोडले

‘वान’सह ‘सोनल’ प्रकल्पातून पाणी सोडले
‘वान’सह ‘सोनल’ प्रकल्पातून पाणी सोडले

अकोला : अाॅगस्टच्या मध्यात झालेल्या पावसामुळे वऱ्हाडात, त्यातही अकोला व वाशीम जिल्ह्यांतील प्रकल्पांना मोठा लाभ झाला अाहे. यामुळेच मागील दोन वर्षांत प्रथमच प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ अाली अाहे. शुक्रवारी (ता. २४) अकोला-बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटिमीटरने उघडण्यात अाले अाहेत. याबरोबरच मालेगाव (जि. वाशीम) तालुक्यातील सोनल प्रकल्प तुडूंब झाल्याने त्यातील पाणी नदीपात्रात वाहत अाहे. परिणामी, सोनल नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्याबाबत तहसीलदारांना कळवण्यात अाले अाहे. 

वारीहनुमान येथे वान नदीवर प्रकल्प उभारण्यात अाला अाहे. या प्रकल्पात सातपुड्यातून पाण्याची अावक होते. या महिन्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने हा प्रकल्प ८५ टक्क्यांवर पोचला. पाण्याची सातत्याने अावक सुरू असल्याने प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात अाले अाहेत. प्रतिसेंकद १५.७५ एवढा विसर्ग होत अाहे. हे पाणी वान नदीपात्रातून वाहू लागले अाहे. संभाव्य पूर परिस्थिती पाहता दानापूर, वडगाव वान, काटेल, कोलद, रिंगणवाडी, वानखेड, पातुर्डा अादी नदी काठावरील दोन्ही कडील गावांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्यात अाला अाहे.

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात असलेला उमा प्रकल्प यापूर्वीच १०० टक्के भरलेला अाहे.  मालेगाव तालुक्यातील शेलूबाजारअंतर्गत असलेला सोनल प्रकल्प शुक्रवारी सकाळी सात वाजता १०० टक्के भरला अाहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहायला सुरवात झाली. हे पाणी अडाण नदीच्या पात्रात पोचले अाहे. त्यातील पाणी अाणखी वाढू शकते. त्यामुळे अडाण नदीच्या काठावरील सोनाळा, खेर्डा, गोगरी, हिरंगी, लाठी, शेलू (बाजार), ईचा नागी या गावांना सुरक्षितेतच्या दृष्टीने सूचना देण्याची विनंती शेलूबाजार सिंचन शाखेच्या शाखा अभियंत्यांनी तहसीलदारांना केली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com