agriculture news in marathi, water scarcity in Aurangabad District, Maharashtra | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

पुणे: सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर आणि पूर्व उतारावर झालेल्या पावसाने राज्यातील बुहतांशी धरणे भरली आहेत. मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात दमदार कोसळणाऱ्या पावसाने पूर्व भागात मात्र दडी मारली आहे. तर मराठवाड्यातही पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे या भागात अद्यापही पाणी टंचाई कायम असल्याचे चित्र आहे.

सामवारपर्यंत (ता. २७) राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती या विभागातील १० जिल्ह्यांच्या ३०९ गावे ३२२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असल्याने ३११ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली.

पुणे: सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर आणि पूर्व उतारावर झालेल्या पावसाने राज्यातील बुहतांशी धरणे भरली आहेत. मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात दमदार कोसळणाऱ्या पावसाने पूर्व भागात मात्र दडी मारली आहे. तर मराठवाड्यातही पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे या भागात अद्यापही पाणी टंचाई कायम असल्याचे चित्र आहे.

सामवारपर्यंत (ता. २७) राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती या विभागातील १० जिल्ह्यांच्या ३०९ गावे ३२२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असल्याने ३११ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली.

पावसात पडणारे खंड, नाशिक, पुणे विभागातील कोरडवाहू तालुक्यांमध्ये पावसाने मारलेली दडी यामुळे यंदा टंचाई दूर झालीच नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, पुणे विभागातील पुणे, सातारा आणि अमरावतीतील बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये टंचाईच्या झळा कायम आहेत. अौरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई असून, २७ आॅगस्टपर्यंत १४९ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५८ टॅंकर सुरू होते.

गतवर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची, टॅंकरची संख्या कमी आहे. गेल्या वर्षी २८ ऑगस्ट रोजी राज्यातील ४३१ गावे, एक हजार १५८१ वाड्यांमध्ये टंचाई असल्याने ४०७ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती विभागांत गेल्या वर्षीही टंचाई होती. गतवर्षी पुणे विभागात टंचाईची तीव्रता अधिक होती, तर यंदा अाैरंगाबाद विभागात सर्वाधिक टंचाई आहे. 

राज्यात टंचाई कमी होत असली, तरी पावसाने ओढ दिलेल्या भागात टंचाई पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात (ता. २०) राज्यातील ५५५ गावे ३४४ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ५९३ टॅंकर सुरू होते.

साेमवारपर्यंत (ता. २७) जिल्हानिहाय पाणीटंचाई स्थिती 

जिल्हा     गावे     वाड्या     टॅंकर
नाशिक     ५७     १४८     ४२
धुळे     ७   ०  
जळगाव     २३  २१
नगर    १६  ७७    २०
पुणे   ४   ३६ 
 सातारा  १३   ५७ ११
अौरंगाबाद    १४९  ०      १५८
जालना १८    ३  २४
नांदेड    १  १   २
बुलडाणा  २१     ०  २१

         

राज्यातील विभागीय टंचाईची स्थिती

विभाग गावे  वाड्या  टॅंकर
नाशिक   १०३  २२५ ९०
पुणे    १७    ९३ १६
औरंगाबाद १६८   ४   १८४
अमरावती  २१   ०  २१
एकूण  ३०९   ३२२  ३११

         
         
    
       
       
        

 
        
    
     

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...