agriculture news in marathi, water scarcity decrease due to rain, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात दमदार पावसामुळे पाणीटंचाईत घट
विकास जाधव
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सातारा : जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत मागील १५ दिवसांत दमदार पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली आहे. जिल्ह्यातील माण, खटाव या दोन तालुक्‍यांत १० गावे व ५५ वाड्या वस्त्यांवर सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण व कोरेगाव तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर झाल्यामुळे प्रशासनाकडून टॅंकर बंद करण्यात आले आहेत. 

सातारा : जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत मागील १५ दिवसांत दमदार पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली आहे. जिल्ह्यातील माण, खटाव या दोन तालुक्‍यांत १० गावे व ५५ वाड्या वस्त्यांवर सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण व कोरेगाव तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर झाल्यामुळे प्रशासनाकडून टॅंकर बंद करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस शेती, धरणातील पाणीसाठा व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन, ऊस, बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी पिके भरण्यास मदत झाली आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने अनेक धरणातून विसर्ग करावा लागला होता. सध्या सर्व धरणांत ९५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असल्याने भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.
 
जिल्ह्यातील पूर्व भागात कमी पाऊस झाल्यामुळे १६ सप्टेंबरपर्यंत ६३ गावे व २७० वाड्या वस्त्यांवरील एक लाख २२९ नागरिकांना ४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यानंतर दुष्काळी तालुक्‍यासह सर्वच भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या १८ दिवसांत सरासरी ११८.६ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.  
 
जिल्ह्यातील ५३ गावांतील व २१५ वाड्या वस्त्यांवरील पाणीटंचाई दूर झाल्याने प्रशासनाकडून या गावातील टॅंकर बंद करण्यात आले. सध्या जिल्ह्यात माण, खटाव या दोन तालुक्‍यांतील दहा गावे व ५५ वाड्या वस्त्यांवरील १० हजार ६९९ लोकसंख्येस सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या पावसामुळे १६ सप्टेंबरच्या तुलनेत टॅंकरच्या संख्येत ३९ ने घट झाली आहे. फलटण व कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यातील टंचाई दूर झाल्याने या तालुक्‍यात टॅंकर बंद करण्यात आले.
 
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे काढणीला आलेली खरीप पिके अडचणीत आली आहेत. मात्र रब्बी हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...