agriculture news in Marathi, water scarcity due to water level decrease in reservoirs , Maharashtra | Agrowon

आटणाऱ्या जलाशयांमुळे जलसंकट
वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

लंडन ः हवामान बदल आणि पावसाचे घटणारे प्रमाण यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये जलाशयातील पाणीसाठे कमी होत अाहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीसंकट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत, मोरोक्को, इराक आणि स्पेन या देशांमध्ये जलाशयातील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे या देशातील पाणीसाठ्यांवर परिणाम होऊन पाणीसंकट वाढणार आहे, अशी माहिती उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षातून मिळाली आहे.

लंडन ः हवामान बदल आणि पावसाचे घटणारे प्रमाण यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये जलाशयातील पाणीसाठे कमी होत अाहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीसंकट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत, मोरोक्को, इराक आणि स्पेन या देशांमध्ये जलाशयातील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे या देशातील पाणीसाठ्यांवर परिणाम होऊन पाणीसंकट वाढणार आहे, अशी माहिती उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षातून मिळाली आहे.

उपग्रहाच्या आधारे जगभरातील जलाशयांचे अवलोकन करून त्याचा निष्कर्ष नुकताच प्रकाशित करण्यात आला. ‘‘सध्या जगभारातील अनेक देशांमध्ये जलाशयांतील पाणीसाठा कमी होत आहे. भारत, मोरोक्को, इराक आणि स्पेन या चार देशांतील जलाशयांतील पाणीसाठा जलदगतीने कमी होत आहे. या देशांमधील तब्बल ५ लाख जलाशये संकुचित पावत आहेत. यामुळे अलीडेच टोकाच्या पाणीटंचाईने ओढावलेल्या ‘डे झीरो’ या परिस्थितीचा अनुभव या देशांनाही लवकरच येईल. उपग्रहाद्वारे येणाऱ्या काळात पाण्याचे नळ कोरडे पडणाऱ्या भागाची चाचणी करण्यात आली. यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे,’’ असेही अहवालात म्हटले आहे.

‘‘सर्वांत चिंतेची बाब म्हणजे भारतात पाणीसाठा कमी होणाऱ्या जलाशयांमध्ये नर्मदा नदीवरील दोन जलाशयांचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेशात मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने इंदिरा सागर सरोवरातील पाणीपातळी खालावली आहे. तसेच सरदार सरोवरातून कमी पाऊस झाल्याने जवळपास तीन कोटी लोकांना पिण्यासाठी पाणी दिल्याने सरोवरातील पाणी कमी झाले,’’ अशी माहिती अहवालात दिली आहे. 

अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहराने देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. सतत तीन वर्षांच्या दुष्काळामुळे येथील प्रशासनाने ‘डे झीरो’ म्हणजेच पाणीटंचाईची गंभीर स्थिती जाहीर केली. परंतु सध्या जगातील डझनभर देशांमध्ये वाढती पाण्याची मागणी, अयोग्य व्यवस्थापन आणि हवामान बदल यामुळे अशेच संकट येण्याची भीती आहे, असे जागतिक संसाधन संस्थेने म्हटले आहे. 

स्पेनमध्ये दुष्काळाचा फटका 
स्पेन देशामध्ये सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे येथील जलाशयांतील पाणीसाठा घटत आहे. येथील सर्वांत मोठ्या ब्यून्डीया सरोवरातील पाणीसाठा यंदा ६० टक्क्यांनी घटला आहे. मोरोक्को देशातही दुष्काळ, सिंचनासाठी पाण्याचा अतिवापर आणि पिण्यासाठी शहरांना जास्त पुरवठा यामुळे येथील जलाशये आटत आहेत. इराक देशात पावसातील तूट आणि जलविद्युत प्रकल्पासाठी लागणारे पाणी यामुळे जलाशयांतील पाणीसाठा कमी होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...