agriculture news in marathi, water scarcity in parbhani, maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 मार्च 2018
परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे पडले आहेत. सात लघू तलावातील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. उर्वरित ११ लघू तलावांमध्ये सरासरी नऊ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
 
दोन मध्यम प्रकल्पांमध्ये १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. विविध प्रकारे प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होत चाला आहे. भूजल पातळी खोल गेली आहे. आठवडाभरात दोन लघू तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्या, तांड्यावरील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत चालले आहे.
 
परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे पडले आहेत. सात लघू तलावातील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. उर्वरित ११ लघू तलावांमध्ये सरासरी नऊ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
 
दोन मध्यम प्रकल्पांमध्ये १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. विविध प्रकारे प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होत चाला आहे. भूजल पातळी खोल गेली आहे. आठवडाभरात दोन लघू तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्या, तांड्यावरील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत चालले आहे.
 
दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. वेगाचे वारे, उन्हामुळे जलाशयातील बाष्पीभवन वाढले आहे. लघू, मध्यम प्रकल्पांतून विविध माध्यमातून उपसा सुरू आहे. त्यामुळे सर्वच प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा घट होत चालली आहे.
 
टाकळवाडी (ता. गंगाखेड) आणि दहेगाव (ता. जिंतूर) हे दोन तलाव या आधीच कोरडे पडले होते. गेल्या आठवडाभरात जिंतूर तालुक्यातील चिंचोली आणि आडगाव हे दोन तलाव कोरडे पडल्याने पाणी आटलेल्या तलावांची संख्या चार झाली आहे. नखातवाडी (ता.सोनपेठ), तांदूळवाडी (ता.पालम), कोद्री (ता.गंगाखेड), जोगवाडा, बेलखेडा, केहाळ, भोसी (ता.जिंतूर) या सात तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यामुळे पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.
 
सध्या पेडगाव लघू तलावात (१५ टक्के), आंबेगाव तलावात (१४ टक्के), झरी तलावात (५३ टक्के), राणीसावरगाव तलावात (६ टक्के), पिंपळदरी तलावात (१२ टक्के), देवगावमध्ये (४ टक्के), वडाळीमध्ये (३ टक्के), चारठाणा तलावात (१२ टक्के), कवडामध्ये (११टक्के), मांडवी तलावात (१ टक्का), पाडाळी तलावात (४० टक्के) अशा ११ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी नऊ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
 
आठवडाभरात जिंतूर तालुक्यातील निवळी खुर्द येथील करपरा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात २ टक्क्यांनी घट होऊन ३० टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात १ टक्क्याने घट होऊन ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. मोठा प्रकल्प असलेल्या येलदरी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा ३.३९ टक्के होता. परंतु शनिवारी (ता. १७) या प्रकल्पांतून सिद्धेश्वर धरणामध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे मृत पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. 
 
सर्वच प्रकल्पांच्या ठिकाणी अनेक गावे तसेच शहरांच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी उद्भव विहिरी आहेत. परंतु जलाशये कोरडे पडत चालली आहेत. विहिरी, बोअरची पाणी पातळी खोल गेली आहे. अनेक गावांतील हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांतील ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळेना झाले आहे.
 
गावे, वाड्या-वस्त्या, तांड्यावरील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत चालले आहे. पाणीटंचाई असलेल्या पालम, पूर्णा तालुक्यातील गावांत सहा टॅंकर सुरू आहेत. टॅंकरची मागणी होत आहे. विहिरी, बोअरचे अधिग्रहण केले जात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...