agriculture news in marathi, Water scarcity in Pune division is acute | Agrowon

पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पुणे : सप्टेंबर महिन्यात पावसाने दिलेली ओढ, ऑक्टोबर महिन्यात वाढलेला उन्हाचा चटका यामुळे पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत. सातारा, पुण्यापाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातही टंचाईत वाढ होत आहे. विभागातील २९ गावे १४९ वाड्यांमधील ५० हजारहून अधिक नागरिक आणि सुमारे १० हजार पशुधनांची तहान भागविण्यासाठी ३२ टॅंकर सुरू करण्यात आले असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

पुणे : सप्टेंबर महिन्यात पावसाने दिलेली ओढ, ऑक्टोबर महिन्यात वाढलेला उन्हाचा चटका यामुळे पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत. सातारा, पुण्यापाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातही टंचाईत वाढ होत आहे. विभागातील २९ गावे १४९ वाड्यांमधील ५० हजारहून अधिक नागरिक आणि सुमारे १० हजार पशुधनांची तहान भागविण्यासाठी ३२ टॅंकर सुरू करण्यात आले असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

पावसाने ओढ दिल्याने यंदा जमिनीची तहान भागलीच नाही. यातच खरिपाची पिके जगविण्यासाठी पाणीउपसा करावा लागल्याने भूजल पातळी खोल जात आहे. पिण्याच्या पाण्याचे स्राेत कोरडे पडू लागले आहेत. पुणे, सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पावसाळ्यातही टॅंकर बंद करता आले नाहीत. पुण्यातील बारामती, दौंड, पुरंदर, शिरूर, साताऱ्यातील खटाव, मान, कोरेगाव आणि सांगलीतील खानापूर तालुक्यात टॅंकर सुरू आहेत. सांगलीत टंचाई वाढत असून, लवकरच आटपाडी, जत, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांमध्येही टॅंकरने पाणी द्यावे लागणार आहे.

साताऱ्यातील २० गावे ८८ वाड्यांमधील ३० हजार नागरिकांना टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई असून, १६ गावे ८५ वाड्यांतील सुमारे २६ हजार नागरिकांना आणि ९ हजार ९०४ पशुधनाची तहान भागविण्यासाठी १७ टॅंकर सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील ८ गावे ६१ वाड्यांमध्ये टंचाई वाढल्याने सुमारे १८ हजार नागरिकांना १० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील एका गावाला १ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाई भासत नसली तरी पुढील काळात टंचाई वाढण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...