agriculture news in marathi, The water scarcity in Pune division increased | Agrowon

पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे विभागात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील सहा तालुक्यांच्या कोरडवाहू पट्ट्यातील २१ गावे १७७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. टंचाईग्रस्त भागातील सुमारे ३८ हजार नागरिकांसह, पशुधनाची तहान भागविण्यासाठी २३ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

पुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे विभागात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील सहा तालुक्यांच्या कोरडवाहू पट्ट्यातील २१ गावे १७७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. टंचाईग्रस्त भागातील सुमारे ३८ हजार नागरिकांसह, पशुधनाची तहान भागविण्यासाठी २३ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

सप्टेंबर महिन्यात पावसाने विभागात सर्वदूर दडी मारल्याने भूजल पातळी खालावली असून, पिण्याच्या पाण्याचे स्राेत कोरडे पडू लागले आहेत. पुणे, साताऱ्यामध्ये भर पावसाळ्यातही टंचाईग्रस्त भागाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. पाणीटंचाईची तीव्रता वाढतच असून, संपूर्ण पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने सांगलीतील दुष्काळी पट्ट्यातही लवकरच टॅंकर सुरू करावे लागणार आहेत. पुढील काळात विभागातील पाणीटंचाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

साताऱ्यातील खटाव, माण, कोरेगाव या तालुक्यांच्या १६ गावे ६९ वाड्यांमधील २२ हजार नागरिकांना आणि टंचाईग्रस्त भागातील सुमारे २ हजार ७०० पशुधनाला १४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यांमधील ७ गावे ५७ वाड्यांमध्ये टंचाई वाढल्याने सुमारे १५ हजारांहून अधिक नागरिकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. तर सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत नसली तरी पावसाने ओढ दिलेल्या भागात पुढील काळात टंचाई वाढण्याची शक्यता आहे.

 

विभागातील पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती
तालुके गावे वाड्या टॅंकर
बारामती ४६
पुरंदर
दौंड
खटाव
माण १२ ६६ १२
कोरेगाव

 

इतर बातम्या
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
दुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार...हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमयेवला, जि. नाशिक : येवला तालुक्यात दुष्काळाची...
मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...
अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...
वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ  ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...