agriculture news in marathi, water scarcity review, meeting, washim, maharashtra | Agrowon

पाणीटंचाई निवारणार्थ तातडीने उपाययोजना करा ः खोत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 मार्च 2018
वाशीम  : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाई निर्माण झालेल्या ठिकाणी तातडीने टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. 
 
वाशीम  : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाई निर्माण झालेल्या ठिकाणी तातडीने टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. 
 
वाशीम दौऱ्यावर असताना श्री. खोत यांनी पाणीपुरवठा, कृषी विभागांचा अाढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. कारंजा येथे पंचायत समिती सभागृहात अायोजित या बैठकीला कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, तहसीलदार सचिन पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, तालुका कृषि अधिकारी समाधान धुळधुळे यांच्यासह सहकार, पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
पाणीपुरवठा विभागाचा अाढावा घेताना श्री. खोत यांनी सध्या केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांच्या सद्यःस्थितीचाही या वेळी आढावा घेतला.
 
याविषयी माहिती देताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नीलेश राठोड यांनी सांगितले, की राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत जिल्ह्याचा आराखडा मंजूर आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात नऊ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असून यापैकी सहा कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे सांगितले.
 
या बैठकीत खोत यांनी जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचे नुकसान पंचनामे, फळपीक विमा योजना व कृषि विभागाच्या योजना, जिल्ह्यात सुरू असलेली तूर खरेदी, कृषि विभागामार्फत उन्नत शेती - समृद्ध शेतकरी अभियान व इतर योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. गावसाने यांनी याविषयी माहितीचे सादरीकरण केले.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...