राज्यात पाणीटंचाईत वाढ; ७८४ टँकर सुरू

टॅंकर
टॅंकर

पुणे : उन्हाचा पारा वाढत असतानाच पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. मराठवाडा व विदर्भात काही भागांत नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या राज्यातील २३ जिल्ह्यांतील तब्बल ७५८ गावे आणि ३३१ वाड्यांवर पाणीटंचाई सुरू असून, या ठिकाणी सुमारे ७८४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.  गेल्या वर्षी राज्यातील ८८६ गावे आणि २२०७ वाड्यांवर सुमारे ६६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार केल्यास टँकरच्या संख्येत ११५ टँकरने वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भविष्यकाळात उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या ओळखून आत्ताच जलयुक्तच्या कामावर भर देण्याची गरज आहे. अन्यथा, पुढील काही वर्षात पाणीटंचाईची समस्या पुन्हा उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.  मध्य महाराष्ट्रात ९८ टँकरने पाणीपुरवठा मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत गेल्या पावसाळ्यात चांगल्या पाऊस झाला होता. खांदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांशी धरणे तुडुंब भरली होती. गेल्या महिन्यापासून या भागात पाणीटंचाईने रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. सध्या नाशिक विभागातील १३० गावे व आठ वाड्यांना ९० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील८ गावे व २५ वाड्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नंदुरबार, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत एकही टँकर सुरू झालेले नाही.    विदर्भात १५९ टँकरने पाणीपुरवठा विदर्भातील अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत पाणीटंचाईने उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षी या जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीटंचाई चांगलीच वाढली आहे. अमरावती विभागातील १६५ गावांमध्ये १५६ टँकरने पाणीपुरवठा नागरिकांना सुरू आहे. नागपूर विभागात चांगल्या पावसामुळे भूजल पातळी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे पाणीटंचाई कमी आहे. नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात भूजल पातळी चांगली असल्याने टँकरने सुरू झालेले नाहीत.  मराठवाड्यात सर्वाधिक पाणीटंचाई गेल्या वर्षी मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला होता. रब्बी हंगामात भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केल्यामुळे भूजल पातळी पुन्हा खोल गेली आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या मराठवाड्यातील ३६३ गावे व ७० वाड्यांवर तब्बल ४७२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक मागणी औरंगाबाद जिल्ह्यातून आहे. औरंगाबादमधील सुमारे २६५ गावे ३२ वाड्यांवर पाणीटंचाई सुरू असून ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी येत्या काही दिवसात ही संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षापूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा केलेल्या लातूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यात अजून टँकर सुरू झालेले नाहीत. कोकणात कमी टँकर कोकणात चालू महिन्यापासून पाणीटंचाई सुरू झाली आहे. सध्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही पाणीटंचाई नाही. कोकणातील ८६ गावे आणि २२८ वाड्यावर पाणीटंचाई सुरू असून ५५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पुढील महिन्यात या संख्येत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.    टँकर सुरू न झालेले जिल्हे सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.  जिल्हानिहाय टँकरची संख्या 

ठाणे  १६
रायगड     १२
रत्नागिरी   ६ 
पालघर   २१
नाशिक   १७
  धुळे    ११
जळगाव     ५९
नगर    ३
औरंगाबाद   ३२४
सातारा    
जालना    ४९
बीड   ५
परभणी   १६
हिंगोली     ११
नांदेड  ६७
अमरावती 
अकोला     ५७
वाशीम     १४
बुलढाणा     ४२
यवतमाळ     ४१ 
नागपूर    
वर्धा    
चंद्रपूर     १ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com