agriculture news in Marathi, water scarcity in state, Maharashtra | Agrowon

राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताच
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

पुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा आलेखही वाढताच आहे. टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धावणाऱ्या टॅंकरमध्ये दररोज भर पडत आहे. राज्यातील ४ हजार ६१५ गावे, ९ हजार ९५९ वाड्यांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ५ हजार ८५९ टॅंकर धावत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. 

पुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा आलेखही वाढताच आहे. टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धावणाऱ्या टॅंकरमध्ये दररोज भर पडत आहे. राज्यातील ४ हजार ६१५ गावे, ९ हजार ९५९ वाड्यांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ५ हजार ८५९ टॅंकर धावत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. 

उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा, पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये टंचाईचा विळखा वाढला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथे ७३४ गावे, २७१ वाड्यांसाठी १ हजार ११० टॅंकर सुरू आहेत, तर बीड जिल्ह्यातील ६३१ गावे, ३२९ वाड्यांमध्ये ८९६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील ५२६ गावे २ हजार ९९७ वाड्यांना ७७६ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. 

गतवर्षी २१ मे रोजी राज्यातील २७ जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त असलेल्या १ हजार ४०५ गावे १ हजार ४७ वाड्यांमध्ये १ हजार ४७० टॅंकरने पाणी द्यावे 
लागले होते. यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, 
जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सांगली आणि सोलापूर, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यातही टॅंकर सुरू करावा लागला आहे. 

सहा जिल्ह्यात एकही टॅंकर नाही
राज्यातील तीव्र टंचाई असताना पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापाही टॅंकर सुरू करावा लागला नसल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने स्पष्ट केले आहे. उन्हाच्या चटक्यामुळे या भागातही पाणीसाठा कमी होत असून, पावसाला उशीर झाल्यास काही ठिकाणी टंचाई भासण्याची चिन्हे आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...