agriculture news in marathi, water scaricity to be continued in buldhana,maharashtra | Agrowon

जून महिना संपत आला तरी निम्मा बुलडाणा कोरडाच
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

बुलडाणा : मृग नक्षत्रात पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. या वर्षी वेळेत पेरण्या होतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र नंतरच्या काळात पावसात खंड पडल्याने जून महिना संपायला अाला तरी या जिल्ह्यातील पेरण्या २० टक्क्यांपर्यंतही पोचू शकलेल्या नाहीत. ८० टक्के क्षेत्र दमदार पावसाची प्रतीक्षा करीत पेरणी वाचून तसेच पडून अाहे.

बुलडाणा : मृग नक्षत्रात पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. या वर्षी वेळेत पेरण्या होतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र नंतरच्या काळात पावसात खंड पडल्याने जून महिना संपायला अाला तरी या जिल्ह्यातील पेरण्या २० टक्क्यांपर्यंतही पोचू शकलेल्या नाहीत. ८० टक्के क्षेत्र दमदार पावसाची प्रतीक्षा करीत पेरणी वाचून तसेच पडून अाहे.

बुलडाणा जिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र सात लाख ४८ हजार ८०० हेक्टर असून, २८ जूनपर्यंत यापैकी १ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या अाहेत. सरासरीच्या अवघ्या १६ टक्के क्षेत्रावर ही पेरणी झाली. जिल्ह्यात अातापर्यंत सरासरीच्या एकूण साडेबारा टक्केच पाऊस पडला अाहे. जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या अाहेत. ज्या भागात पाऊस पडतो तिकडे पेरण्यांची कामे शेतकरी सुरू करतात.   

जिल्ह्यात सध्याची स्थिती पाहली तर संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, या तालुक्यांमध्ये जून महिन्यातील अपेक्षित पावसाच्या अवघा १० टक्केही पाऊस पडलेला नाही. परिणामी या तालुक्यांमध्ये पेरण्यांची कामे पूर्णतः रखडलेली अाहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला तर घाटावर पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. मात्र हा पाऊसही तितकासा जोरदार व समाधानकारक नाही.  

जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर प्रामुख्याने मका, कपाशी या पिकाच्या लागवडीला पोषक स्थिती मानली जाते. या महिन्यातील लागवड असेल तर उत्पादन चांगले येऊ शकते. अाता जून महिला लोटला तरी सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात मका, कपाशीच्या लागवडीला फटका बसण्याची शक्यता अाहे. ही दोन्ही पिके चांगला पैसा देणारी अाहेत. त्यातही मक्यासारखे पीक घेऊन अनेक शेतकरी रब्बीत दुसऱ्या पिकाची लागवड करीत असतात. यंदा पावसाअभावी मक्याचे लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता अाहे. या परिस्थितीत हे क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली येऊ शकते, असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज अाहे.      

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी (२८ जूनची अाकडेवारी) ः बुलडाणा १७.११, चिखली १६.१८, देऊळगावराजा १३.३०, सिंदखेडराजा १७.१८, लोणार १५.७७, मेहकर १५.४३, खामगाव  १२.४३, शेगाव  ९.३८, मलकापूर १५.४२, नांदुरा ७.२९,  मोताळा १३.५७, संग्रामपूर ४.६८, जळगाव जामोद १०.१७, एकूण १३.२ टक्के.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...