agriculture news in marathi, water scaricity to be continued in pune region,maharashtra | Agrowon

पुणे विभागात ७० टॅंकरव्दारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

पुणे  : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. विभागातील ७७ गावे ३४४ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ७० टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरच्या पाण्यावर सुमारे १ लाख ११ हजार लोकसंख्या आणि सुमारे १० हजार जनावरांची तहान भागत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पुणे  : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. विभागातील ७७ गावे ३४४ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ७० टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरच्या पाण्यावर सुमारे १ लाख ११ हजार लोकसंख्या आणि सुमारे १० हजार जनावरांची तहान भागत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी होऊ लागली असली तरी अद्यापही तेथे विभागातील सर्वाधिक पाणीटंचाई आहे. साताऱ्यातील नऊ तालुक्यांतील ४३ गावे १२६ वाड्यांमधील सुमारे ४६ हजार लोकसंख्या आणि १० हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३६ टॅंकर सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली असून, दहा तालुक्यांतील २९ गावे २०५ वाड्यांमधील ५७ हजार २५७ लोकांना ३१ टॅंकरने पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील पाच गावे आणि १ वाडी-वस्तीवरील सुमारे ६८०० लोकांना पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने पाणीपुरवठ्यासाठी तीन टॅंकर सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील दोन वाड्यांमध्ये टंचाई जाणवत असल्याने ६७१ लोकसंख्या अाणि २९० पशुधनाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सोलाूपर जिल्ह्यात यंदा पाणी टंचाई तीव्रता नसल्याने टॅंकर सुरू करावे लागले नाहीत. मात्र पाणीपुरवठ्यासाठी दोन स्त्राेतांचे अधिग्रहण करावे लागले आहे.

विभागातील टंचाईग्रस्त भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी   ७२ विहिरी किंवा बोअरवेल आदी जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आल्याची विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

विभागातील पाणीटंचाईची स्थिती

जिल्हा गावे वाड्या लोकसंख्या पशुधन टॅंकर
पुणे २९ २०५ ५७,२५७ ३१
सातारा  ४३ १२६ ४५,९५३ १०,१९१ ३६
सांगली  ६७८२
काेल्हापूर ६७१ २९०  ०

 

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...