agriculture news in marathi, water scaricity to be continued in pune region,maharashtra | Agrowon

जोरदार पावसाअभावी पुणे विभागात पाणीटंचाई कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर पुणे विभागातील दुष्काळी भागात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. विभागातील पाणीटंचाई कमी होत असली तरी अनेक भागांत तीव्रता अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांतील १३ तालुक्‍यांमधील ३६ गावे १४३ वाड्यांना ३२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर पुणे विभागातील दुष्काळी भागात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. विभागातील पाणीटंचाई कमी होत असली तरी अनेक भागांत तीव्रता अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांतील १३ तालुक्‍यांमधील ३६ गावे १४३ वाड्यांना ३२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक आहेत. जिल्ह्यातील २७ गावे, ८२ वाड्यांमधील सुमारे ४१ हजार लोकसंख्या आणि पाच हजारांहून अधिक जनावरांसाठी २० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्‍यांतील ४ गावे ५८ वाड्यांना ९ टॅंकर, तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यातील ५ गावे एका वाडीला तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूरमधील दुर्गम भागातील वाडीवस्त्यांमधील नागरिकांना; तसेच जनावरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागात गतवर्षी याच कालावधीत टंचाईची तीव्रता अधिक होती. विभागातील २७९ गावे आणि १७८६ वाड्यांना २६७ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.

सांगलीतील १५१ गावे १०९० गावांना १५१ टॅंकर, साताऱ्यातील ९३ गावे २७८ वाड्यांना ६० टॅंकर, पुणे जिल्ह्यातील ३० गावे ४०० वाड्यांना ३० टॅंकरने, तर सोलापुरातील ५ गावे १८ वाड्यांना ४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई भासलेली नाही. विभागातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्‍यकता आहे.

विभागातील टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची स्थिती :
सातारा : खटाव ६, माण ५, कोरेगाव ५, वाई २, कराड १, खंडाळा १.
पुणे : जुन्नर २, खेड १, बारामती ३, पुरंदर २, दौंड १, मुळशी १.
सांगली : खानापूर ३.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...