agriculture news in marathi, water scaricity decrease in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कमी
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 एप्रिल 2018

गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी जिरल्याने यंदा विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे यावर्षी टंचाई जाणवेल असे वाटत नाही. लोणी भापकर, पळशी, सायंबाची वाडी, जळकेवाडी भागात पाणीटंचाई नाही.
- मनोहर भापकर, सायंबाची वाडी, बारामती, जि. पुणे.

पुणे : जलसंधारण कामांमध्ये झालेल्या पाणीसाठ्यामुळे भूजल पातळी वाढली असून यंदा जिल्ह्यात पाण्याची स्थिती चांगली आहे. कायम दुष्काळी भागातही यंदा एप्रिल महिन्यात टॅंकर सुरू करावे लागलेले नाहीत. पुढील काळात उन्हाचा चटका वाढून काही ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मात्र गेल्या तीन वर्षांतील एप्रिल महिन्याची स्थिती पाहता यंदा पाणीटंचाई खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. 

 जिल्ह्यातील आंबेगाव आणि बारामती तालुक्‍यांमध्ये २०१५ मध्ये पाणीटंचाई भासली होती. या दोन्ही तालुक्‍यांमधील २ गावे २५ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ५ टॅंकर सुरू करण्यात आले होते. सलग दोन वर्षे अपुरा पाऊस झाल्याने २०१६ मध्ये जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता खूपच वाढली होती.

जिल्ह्यातील ४१ वाड्या आणि ४२५ वस्त्यांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवावी लागली होती. आंबेगाव, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्‍यांमध्ये टंचाईच्या तीव्र झळा होत्या. २०१७ मध्येही पुरंदर तालुक्‍यातील ४ गावे आणि ३३ वाड्यांना ९ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

गतवर्षी पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस पडला होता. यातच जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात जलसंधारणांच्या कामांमध्ये पाणीसाठा झाला. त्यामुळे यंदा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई भासलेली नाही.

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...