agriculture news in marathi, water scaricity in dhule district, maharashtra | Agrowon

धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018
धुळे  ः जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, टॅंकर वाढविण्याची मागणी केली जात आहे. 
 
धुळे  ः जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, टॅंकर वाढविण्याची मागणी केली जात आहे. 
 
जिल्ह्यात यंदा पाऊस हवा तसा नव्हता. सरासरीच्या सुमारे ८२ टक्के पाऊस झाला आहे. परंतु विहिरी व कूपनलिका यांची पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने नदी व नाले खळखळून वाहिलेच नाहीत. पाऊस ऑक्‍टोबर महिन्यात झाला. सरासरीपर्यंत पाऊस झाला, परंतु हव्या त्या भागात पाऊस नव्हता. त्यात साक्री तालुक्‍याचा उत्तर भाग, धुळे तालुक्‍यातील पूर्व व पश्‍चिम भाग, शिरपूर तालुक्‍यातील मध्य आणि दक्षिण भाग, शिंदखेडा तालुक्‍यातील पूर्व आणि दक्षिण भागात पाऊस नव्हता.
 
सद्यःस्थितीमध्ये सुमारे ६२ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून, तात्पुरत्या पाणी योजनाही राबविल्या जात आहेत. परंतु तात्पुरत्या पाणी योजनांना मात्र अडचणी येत असून, या योजनांच्या स्रोतांनाही मुबलक पाणी नसल्याने समस्या वाढल्या आहेत. 
 
बेटावद, न्याहळोद, कापडणे, दोंडाईचा आदी मोठ्या गावांमध्ये पाण्याबाबत काटकसर करावी लागत आहे. पांझरा नदीला नंतर पाणी आले होते. त्यामुळे काहीसे जलसाठे वाढले. परंतु फेब्रावारीअखेरच जलसाठे कमी झाले आहेत. आजघडीला शेतांमधील विहिरी व कूपनलिकांचे पाणी घटले असून, सिंचन करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. 
 
शिंदखेडा व शिरपूर तालुक्‍यातील पाण्याची समस्या असलेल्या भागातील केळी बागांनाही फटका बसत आहे. शेतकऱ्यांना पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना नाकीनऊ येऊ लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...